दिनेश कार्तिकच्या बायकोला पाहुन तुमचे होश नक्कीचं ऊडतील!

“ज्याच्या वाट्याला नशिबाचे भोग येतात आणि त्यावर यशस्वी मात करुन जो पुढे सरसावतो त्यास नियतीही साथ देतेचं देते!” अशीच काहीशी सिनेमाप्रमाणे जिवनकहाणी भारतीय क्रिकेटपटु दिनेश कार्तिकची आहे. पहिली पत्नी निकिताशी बांधलेली संसारगाठ आपल्याचं सहकारी मित्राकडुन सुटल्यावर फारकाळ खचुन न जाता पुढे “दिपीका पल्लीकल” ही स्वर्गसुंदर अप्सरा त्याच्या आयुष्यात आली. दिसायला अतिशय सुंदर आणि व्यवसाय आणि कलागुणाने “स्क्वॅश” खेळाडु असलेली दिपिका पल्लिकलने सन २०११ मध्ये पहिल्या दहा खेळाडुंमध्ये स्थान मिळवत जागतिक पातळीवर गुणवत्ता सिध्द केली.

२०१२ मध्ये खेळातील सर्वौच्च असा अर्जुन पुरस्कार आणि २०१५साली पद्मश्री खिताबही तिने मिळवला. मग, मागे वळुन न पाहता एकाचढ एक खिताब जिंकत तीने अनेक यशोशिखरे पादाक्रांत करुन यंदाच्या मोसमात “दुहेरी” आणि “मिश्र दुहैरी” गटात भारतास “सुवर्णपदक” मिळवुन दिले. पण, सन-२०१२ते २०१५ह्या कालावधीत तिने खेळापासुन संन्यासही घेतला कि ज्याला कारणही तसेच होते.

खेळात महिला व पुरुष स्पर्धकास मानधनात मिळणारी असमानता म्हणजे जवळपास ६०% कमी वाटा तिने मान्य केला आणि पुढे तिच्या ह्या लढ्याला यश मिळाले व सन-२०१६ पासुन ती पुन्हा कार्यरत झाली. दरम्यान आपल्या पहिल्या यअशस्वी विवाहाने ग्रासलेला दिनेश आणि तिची भेट झाली व त्यांची तिथेच मने जुळली. ह्या जोडीने सन-२०१५ मध्ये विवाहही केला. हा विवाह दिपिकाच्या धर्मानुसार ख्रिश्चन आणि दिनेशच्या हांदु अश्या दोन्ही धर्मपध्दतीने पार पडला. त्यांच्या संसारवेलीवर पुढे सन-२०२१मध्ये “कबीर” आणि “झियान” अशी दोन जुळी पुत्ररत्ने ऊमलली. चला,तर ह्या जोडीला बघुयात.
©️स्वप्निल लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *