एकटी बाई पाहुन घरात शिरले चोर आणि नंतर तिच्याऽऽऽ….

“वाढती महागाई आणि त्यामुळे भर म्हणुन सोबतचं वाढलेली बेरोजगारीने आज सर्वांच्याचं नाकीनऊ आलेत. ह्याचं समस्येने जन्म दिलेल्या गुन्हेगारी क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली दिसुन येते. चैनीसाठी म्हणा की पोट भरण्यासाठी पण हे धाडसी आणि जीवावर बेतणारे कृृृत्य करणारे आज कशासही मागे पहात नाहीत. नुकत्याचं आलेल्या “दिल्ली क्राईम-०२” ह्या मालिकेतुन आपण हे समाजातील दुर्लक्षित पण नागडे सत्य बघितलेचं आहे.

काही जमातींवर तर जन्मजात ह्याचा ठसाचं जणु समाजाने ऊमटवलाय जो आज एकविसाव्या शतकातही पुसला जाणे अवघड आहे. विनासायास मिळणारा पैसा आणि ऐवज ह्याला भुलुन अशिक्षित आणि शिकलेली पीढीही ह्या क्षेत्रात लक्षणीय आहे. माहीती तंत्रज्ञान युगात चोरीच्या नवनविन कल्पना आणि त्याला भर घालणारे सर्व प्रकारचे सिनेमे आज समाजाच्या एका पीढीचे आदर्श ठरताहेत.

चोरीच्या ऊद्देशाने झालेला प्रवेश पुढे कैक जीवांचा बळी घेत एक पुर्ण पीढी बरबाद तर करतोचं पण समाजही नासवतो. माहिती व तंत्रज्ञानामुळे बॅकिंग तसेच मध्यंतरी व अजुनही तितकासा प्रखर नसला तरी आपला प्रभाव टिकवुन असलेल्या कोरोनासारख्या महामारीने आपले महत्व वाढलेली ऑनलाईन ट्रान्सॲक्शन्स सायबर चोरट्यांसाठी पर्वणी ठरलीय.

नवनविन कल्पना लढवत समोरच्या व्यक्तीचे अकाऊंट क्षणार्धात खाली केले जातेय. जागतिक मंदीचे सावट आणि युध्दजन्य परीस्थिती त्यातही आर्थिक महासत्ता ठरलेल्या चीन,अमेरिकेची नेहमीची मुजोरी लहान व विकसनशील राष्र्टांच्या प्रगतीत मोठे अडथळे ठरताहेत. ऊत्तरेकडील राज्ये आणि सर्वचं प्रगत राज्यांतही ह्या चोरींच्या प्रकरणाने पोलीस प्रशासनासह नागरिकांसह वेठीस धरले आहे. एकट्यादुकट्या स्त्रीचे तर मग काही खरेचं नाही. भरदिवसाही दरोडा टाकला जातो.
©️स्वप्निल लव्हे

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *