बबड्याच्या आईचा हा आहे खरा बबड्या

बबड्याची भोळिभाबडी प्रेमळ आई म्हणजेचं सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री निवदिता सराफ. सुरवातीपासुनचं मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टी गाजवलेल्या निवेदिता आता ऊत्तरार्धात दुरदर्शवर अधिक सक्रिय दिसुन येतात. नुकत्याच गाजलल्या “अग्गबाईऽऽऽसासुबाई” ह्या मालिकेत त्यांचा “आसावरी”चा रोल व बबड्या कॅरेक्टर खुप गाजले.

पण खर्या आयुष्यात निवेदितांचा बबड्या कोण आहे? तो काय करतो? कसा दिसतो? चला तर जाणुन घेऊयात निवेदिता सराफ आणि अशोक सराफ ह्या ऊभयंतांचा एकुलता एक लेक म्हणजे अनिकेत सराफ. दोघांच्याही समकालीन नावाजलेले व मित्रवर्य अभिनेते महेश कोठारे,लक्ष्मिकांत बेर्डै,सचिन पिळगावकर ह्यांची पुढील पीढी अनुक्रमे आदित्य कोठारे,अभिनव बेर्डै आणि श्रिया पिळगावकर हे मात्र आपल्या आईवडिलांप्रमाणेचं चित्रपटसृष्टीत आले व काही प्रमाणात स्थिरस्थावर झाल्याचे दिसते.

पण,अनिकेत मात्र कुठेही दिसुन येत नाही. नेहमीचं ह्या ग्लॅमरस दुनियेपासुन दुर राहिलेला हा आईचा लाडका बबड्या मग नक्की करतो तरी काय??? तर ऐकुन नक्कीचं आश्चर्याचा धक्का बसेन पण अनिकेत हा ह्या मोह-मायाजाळापासुन दुर अश्या दुनियत असतो. त्याने आपले करीअरही वेगळी वाट शोधत निवडलयं. अनिकेतला लहानपणापासुन आईसोबत किचनमध्ये रमायला आवडायचे.

किचनमध्ये नवनविन प्रयोग करत पुढे आईची अपुर्ण ईच्छा अनिकेतने पुर्ण केली. तो आपले पुढील शिक्षण फ्रान्समध्ये घेऊन “शेफ” बनलाय. आपल्या आईवडीलांना स्वतःच्या हाताने खाऊ घालत तो त्यांचा लाडका तर आहेचं पण त्यांनाही त्याचा हा निर्णय आवडलाय व साथ लाभली आहे. निवेदितांना अनिकेतने बनवलेला “मार्बल केक” सगळ्यात जास्त आवडतो तर वडील अशोक सराफांना अनिकेतची “ब्राउनी” रुचकर लागते. अनिकेत पाश्चात्य पध्दतीच्या डिशैस ऊत्तम बनवतो.
©️स्वप्निल लव्हे

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *