aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

“रात्री अपरात्री शेतीला पाणी भरतायं? पण, #बिबट्या आणि ईतर प्राण्यांची भीती वाटतीयं? मग, शेतकर्याची हि आयडियाची कल्पना बघाचं!”

“आजकालच्या धावपळीच्या जगात , अत्यंत बेभरवशाचे आयुष्य जगताना सर्वांनाच अनंत अडचणींना तोंड देत आयुष्य जगावे लागते. भल्या पहाटेपासुन दिवस सुरु करणारा श्रमिक ते अरबो रुपये अंथरुणाशी वळचणीला असलेले ऊद्योगपती ह्यांनाही टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट चुकत नाही. तेथे, आपण पामराचे काय?” परंतु, नेहमीच नशीबाने दान दिलेले आणि अपार कष्टाने फुलवलेले पीक हाती लागेलचं ह्याची कवडीचीही शाश्वती आज जगाच्या पोशींदा मायबाप शेतकरी वर्गाला राहिलेली नाहीय.

त्यातचं जागतिक तापमानवाढीचा परीणाम ठरलेले लहरी हवामान आणि अनियमित व अतीपाऊस,पुर व होणारे शेतीचे नुकसान गेल्या दशकापासुन पाचवीला पुजलं गेलयं! हावरट मनुष्य प्राण्याने अश्मयुगापासुन विकसित होत-होत आजवरच्या २१’व्या शतकापर्यंत तंत्रज्ञानासह नेत्रदिपक प्रगतीची मजल मारताना ईतर पशु,पक्षी व प्राणिमात्रांवर न सरळ दया दाखवली न् छळ केला.

पण,त्याच्यामुळे त्यांचे जग विस्कळित झाले हे नाकारता येणार नाही. घनदाट जंगले वणवा वा मानवनिर्मित संकट आणि लोभापायी नष्ट होऊ लागली आणि जंगलातील आपला निवारा गमावलेली जंगली श्वापदे निवारा आणि अन्न शोधत आता मानववस्तीत सर्रास शिरलेली पहायला मिळतात. त्यातही रानडुक्करे,हरणं,गवे,हत्तींचे कळप आणि ग्रामीण व घनदाट झाडी, शेती असलेल्या भागात

बिबट्या प्राण्याचे आक्रमण वाढलेले दिसुन येते व ह्यावर मात करताना नेहमीचं दिव्यदृष्टी आणि भुतलावर सर्व प्राणिमात्रांत चतुर मेंदु लाभलेला मानव मग कसा मागे राहीन??? अश्याचं एका अवलियाने जंगली श्वापदांपासुन बचाव करण्याचा अतिशय सोपा,कमी खर्चिक असा प्रयोग केलाय…. तो बघुन हसु नक्कीचं आवरणार नाही आणि कौतुकाची थापही द्याल!

©️स्वप्निल लव्हे

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *