aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

सैराट चित्रपटातील या अभिनेत्याला होणार अटक

मित्रानो २०१६ मध्ये आलेला सैराट चित्रपट तुम्ही पाहीला असेलच. या चित्रपटाने सर्वना वेड लावले होते अजूनदेखील हा चित्रपट लोक आवडीने पाहतात. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला. नागराज यांच्या शॉर्ट फिल्म ला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांच्या सैराट चित्रपटाला देखील पुरस्कार मिळाला. आर्ची आणि परश्या एका रात्रीत मोठे स्टार झाले.

आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू नंतर अनेक चित्रपट आणि वेब्सिरीज मध्ये दिसली. परश्या म्हणजेच आकाश ठोसर ला देखील नंतर चित्रपट मिळाले. सैराट या चित्रपटात व्हिलन ची भूमिका साकारणारा प्रिन्स तुम्हाला माहिती असेलच. आर्ची चा भाऊ म्हणजेच प्रिन्स. प्रिन्स चे खरे नाव सुरज पवार असे आहे. याच प्रिन्स ला अटक होणार आहे. होय प्रिन्स म्हणजेच सुरज पवार सध्या अडकला असल्याचे समजले आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये फसवणुकीचा प्रकार घडला आहे. नोकरीच लावून देऊ असे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली होती. या फसवणुकीच्या प्रकरणात सुरज पवार याचा सम्बन्ध असल्याचे कळले आहे. त्या कारणामुळे संशयतांवर गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज चा देखील सम्बन्ध या गुन्ह्यात असल्याची दाट शक्यता असल्याने त्याला अटक होऊ शकते. तीन लोकांना पो’लि’सांनी अटक केली आहे.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *