aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

दीपा कार्तिक एकत्र करणार संसार

मित्रानो स्टार प्रवाह वाहिनी खूप प्रसिद्ध वाहिनी होणे शक्य आहे. रंग माझा वेगळा मालिका अनेक लोकांना आवडते मात्र या मालिकेत खूप स्वप्न दाखवली जातात आणि प्रेक्षकांच्या मनाचा अंत होतो. सतत दाखवले जाते कि काहीतरी चांगलं घडेल आणि दीपा कार्तिक एकत्र येतील. नंतर मात्र ते स्वप्न असत असं पाहायला मिळत. अनेक महिने उलटले मात्र अजून देखील प्रेक्षकांना खेळवलेच जाते.

दोघांचा सुखी संसार अनेक प्रेक्षकांना पाहायचा आहे. मात्र मालिकेत सतत दाखवली जाणारी स्वप्ने आणि विनाकारणच दीपाचा छळ होताना दिसत असल्याने जवळपास निम्मे प्रेक्षक मालिकेवर भडकले आणि मालिका बघणे देखील सोडून दिले. मालिका म्हणजे सस्पेन्स आलाच मात्र या मालिकेला खूपच जास्त बोरिंग दाखवले जात आहे. इतका वेळ गेला तरी देखील दीपा आणि कार्तिक दोघांना साधी गोष्ट काळात नाही आणि ते एकत्र येत नाही.

दीपाला आता दीपिका तिची मुलगी आहे हे कळले आहे. असे असले तरी नक्की पुढे काय होईल माहिती नाही. दीपिकावर कार्तिकचा जीव असल्याने तो दीपिकासाठी दीपा शी पुन्हा लग्न करेल आणि मालिका संपेल असं दिसून येत आहे. मात्र चाहत्यांना दीपा आणि कार्तिक यांचे चांगले आयुष्य आणि संसार पाहण्याची खूप इच्छा आहे. सगळेच जवळपास हताश होऊन मालिका बघणे सोडून देत आहेत. तरी देखील अजून दोघे एकत्र येताना दिसत नाहीत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *