अरुंधती ने दिली आनंदाची बातमी

‘आई कुठे काय करते’ हि मालिका तुम्ही आवडीने पाहत असाल. या मालिकेत नको ते संबंध दाखवले गेले आहेत. पण आई घरासाठी कशी झटते किती प्रयत्न करते, आईच कुटुंबावरच प्रेम या मालिकेतून पहायला मिळत. तुम्ही आजवर अनेक मालिका पहिल्या असतील. जास्त मालिका या कुटुंबावर आधारित असतात. कारण कुटुंबातील लोक एकत्र मालिका बघत असतात.

आई कुठे काय करते या मालिकेत अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. अरुंधती म्हणजेच खऱ्या आयुष्यातील ‘मधुराणी गोखले प्रभुळकर’ विषयी आपण बोलणार आहोत. मधुराणी ने अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या इन्स्टा वर खूप अभिनेते ऍक्टिव्ह असताना पाहायला मिळतात. मधुराणी देखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.

मधुराणीने लाल साडी घालून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातून तिला खूप आनंद झाल्याचे पाहायला मिळते. तिने एका नवीन जाहिरातीमध्ये काम केले आहे याची गॉड बातमी तिने लोकांना कळवली आहे. दिसायला सुंदर असणारी मधुराणी एका मुलीची आई आहे. तुम्हाला मधुराणी खूप आवडत असेल आणि खऱ्या आयुष्यात तिचे फोटो पाहायला देखील आवडेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *