हि मुलगी आहे मराठमोळ्या मृणाल कुलकर्णी ची सून

पूर्वी खूपच कमी लोकांकडे टीव्ही असायचा आणि एक ते दोन वाहिन्या प्रकाशित व्हायच्या. त्यानंतर केबल आली आणि आता तर विचारूच नका इतके चॅनेल प्रत्येक भाषेमध्ये आलेले आहेत. तुम्ही तुमच्या लहानपणी शक्तिमान पाहिला असेलच. त्यानंतर स्टार प्लस सारख्या वाहिनीवर ‘सोन परी’ हि मालिका लागायची जी तुम्हाला माहिती असेलच.

सोन परी ची भूमिका मराठमोळ्या ‘मृणाल कुलकर्णी’ या अभिनेत्री ने पार पाडली असून तिने अनेक चित्रपट देखील गाजवले आहे. अजून देखील ‘द काश्मीर फाईल्स’ सारख्या चित्रपटामध्ये काम करून ती नाव कमावत आहे. याच मृणाल ला २९ वर्ष्यांचा ‘विराजास कुलकर्णी’ नावाचा मुलगा आहे. खूप कमी लोकांना हे माहित आहे कि तिचा मुलगा इतका मोठा आहे.

विराजस ने ‘शिवानी रांगोळे’ या मुलीशी लग्न करून मृणाल साठी सून आणली आहे. शिवानी आणि विराजस चांगले मित्र होते नंतर त्यांनी लग्न देखील केले. अनेक चित्रपट मालिकांमध्ये शिवानी ने काम केले आहे. २८ ऑक्टोबर १९९५ ला जन्मलेली शिवानी आता २६ वर्ष्यांची सुंदर तरुण अभिनेत्री आहे. माझा होशील ना मालिकेमध्ये दोघान्ची जोडी तुम्ही पहिली असेलच.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *