NMJOKE

तानाजी मधल्या चुलत्या ची बायको पाहून खुश व्हाल

सध्या ऐतिहासिक चित्रपट खूप येत आहेत. तान्हाजी चित्रपट खूप गाजला सर्व मराठमोळ्या बांधवानी तो चित्रपट आवडीने पहिला. या चित्रपटात अनेक अभिनेत्यांनी उत्तम भूमिका बजावली. अजय देवगण ने तानाजी मालुसुरे यांची भूमिका उत्तम पार पाडली. आज आपण याच चित्रपटामध्ये असणाऱ्या चुलत्या चे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत.

चुलत्या ची भूमिका कमी असली तरी तो चित्रपटामध्ये खूप गाजला होता. चुलत्याचे खरे नाव ‘कैलास वाघमारे’ आहे. मनातल्या उन्हात, ड्राय डे, हाफ तिकीट अश्या १० पेक्ष्या अधिक चित्रपटांमध्ये कैलास ने काम केले आहे. कैलास ने ‘मीनाक्षी राठोड’ या मुलीसोबत लग्न केले आहे. जालना येथे १७ मार्च ला मीनाक्षी चा जन्म झाला. ती सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेत देवकी चा अभिनय करते.

होय हे खरे आहे, देवकी म्हणजेच मीनाक्षी हि कैलास ची खऱ्या आयुष्यातली बायको आहे. दोघांनी एकत्र देखील अनेकदा काम केले आहे. मालिकेत दिसायला खूपच सुंदर असणारी मीनाक्षी खऱ्या आयुष्यात तर खूपच मॉडर्न आहे. तुम्ही तिचे फोटो पाहून खुश व्हाल अशी आशा आहे. रंग आणि दिसण्यावरून नाही तर आतील कलागुणांमुळे माणूस ओळखला जातो याच हे उदाहरण आहे.

Exit mobile version