हि मराठमोळी अभिनेत्री होणार आई

तुम्ही टीव्ही वर कोणती तरी मालिका पाहत असालच. आजवर अनेक मालिका आल्या आणि गेल्या. काही मालिका लोकांना इतक्या आवडत होत्या कि त्या बंद न व्हाव्या अशी अनेकांची इच्छा होती. असं सासर सुरेख बाई हि मालिका देखील अनेकांच्या आवडीची होती. मालिकेमध्ये जुई तर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसायची. अनेक लोक तर फक्त ती दिसावी म्हणून मालिका पाहायचे.

त्याच जुई चे खरे नाव ‘मृणाल दुसानिस’ आहे. मृणाल चे वय ३३ वर्षे आहे सोबतच तिची सुंदरता तर लोकांना घायाळ करणारी आहेच. २०१६ मध्ये नीरज मोरे या मुलासोबत मृणाल ने लग्न केले होते. पडद्यावरून जरी मृणाल गायब झाली असली तर तिच्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. मृणाल आई होणार आहे.

होय मृणाल ने स्वतः सोशल मीडियावर आई होण्याची बातमी शेअर केली आहे. आपल्या पतीसोबत मृणाल अमेरिकेमध्ये राहत असून देखील ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. आता आम्हाला मुलासाठी स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे असे देखील तिने फोटो शेअर करत सांगितली. मृणाल ने लहान मुलाचे कपडे आणि टेडी चा फोटो शेअर केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *