असं सासर सुरेख बाई मधली जुई आता दिसते इतकी आकर्षक

मराठी सिनेसृष्टीमधे अनेक अभिनेते अभिनेत्र्या आहेत. शून्यातून मोठे कलाकार झालेले खूप जास्त कलाकार असतात. मुंबईमध्ये आपली स्वप्न खरी करण्यासाठी अनेक लोक येतात. प्रत्येक जण काहीतरी करत असतो आणि मोठा होत असतो. अभिनय क्षेत्रात देखील असच काही आहे. अनेक लोक छोटे मोठे अभिनय करून नंतर मोठे कलाकार होतात.

काही लोक असे असतात जे चांगला अभिनय करतात पण तरीदेखील प्रसिद्धी मिळवू शकत नाहीत. अनेक मालिका तुम्ही पहिल्या असतील त्यापैकीच एक जुनी मालिका ‘असं सासर सुरेख बाई’ हि तुम्ही पहिली असेल. अनेक लोकांना हि मालिका खूप आवडत होती. काही लोक तर फक्त जुई ला बघण्यासाठी हि मालिका पाहत होते असं म्हणायला हरकत नाही.

मालिकेत जुई चे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रींचे नाव ‘मृणाल दुसानिस’ आहे. मृणाल अगोदर खूप लोकांची चाहती होती मात्र तिने लग्न केले आणि नंतर ती चित्रपट सृष्टीमधून गायबच झाली. २० जून १९८८ ला नाशिक मध्ये जन्मलेली मृणाल आता ३३ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे. २०१६ मध्ये तिने ‘नीरज मोरे’ सोबत लग्न केले. तिने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून आपली ओळख बनवली होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *