आई कुठे काय करते मधली संस्कारी अरुंधती खऱ्या आयुष्यात

मनाला वाटेल तसं जगावं असं तुम्ही खूपदा ऐकलं असेल. अनेक लोक इतरांचा विचार करून मन मारून जगत असतात. पण मनाला पटेल तस माणसाने राहावं त्यातच खरं सुख आहे. तुम्ही टीव्हीवर अनेक मालिका, चित्रपट पाहत असता. त्यामध्ये मिळेल ती भूमिका उत्तम प्रकारे कलाकार साकारत असतात. मात्र खऱ्या आयुष्यात ते तसे असतीलच असे नाही.

व्हिलन ची भूमिका साकारणारे खऱ्या आयुष्यात पण तसेच असतील असं नाही. त्याच प्रकारे चांगली संस्कारी भूमिका साकारणारे कलाकार देखील खऱ्या आयुष्यात तसे असतील असे नाही. अभिनय उत्तम प्रकारे पार पडणारा व्यक्ती खरा कलाकार असतो. आज आपण ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधती विषयी पाहणार आहोत.

अरुंधती चे खरे नाव ‘माधुरी गोखले प्रभुळकर’ हे आहे. मालिकेमध्ये माधुरीला आईची भूमिका दिली आहे सोबतच पतिव्रता पत्नी देखील दाखवली आहे. मालिकेत जस तिला दाखवलं आहे तशीच ती खऱ्या आयुष्यात असेल असे सांगता येत नाही. माधुरी खूप उत्तम अभिनेत्री आहे तिने लेकरू, मणी मंगळसूत्र सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तुम्हाला फोटो पाहून ती खऱ्या आयुष्यात कशी वाटते ते आम्हाला सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *