फॅन्ड्री मधल्या जब्या ची नवीन शालू पाहून वेडे व्हाल

नागराज मंजुळे यांनी सुरुवातीला ‘पिस्तुल्या’ नावाची शॉर्ट फिल्म काढली. त्याला देखील सन्मानचिन्ह मिळाले. त्यानंतर २०१४ मध्ये ‘फॅन्ड्री’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या थीम सॉंग ने धुमाकूळ घातला. अजून देखील तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला हे गाणं वाजवलं जात. अनेकांनी चित्रपट पहिला मात्र चित्रपटामध्ये शालू ला म्हणजेच ‘राजश्री खरात’ ला जास्त डायलॉग नसल्याने लोकांना तो आवडला नाही.

एक गरीब घरातील मुलगा शाली च्या मागे लागतो. तिच्यावर प्रेम करतो, तिचीच स्वप्न पाहतो, तिला मिळवण्यासाठी काळ्या चिमणीच्या शोधात तो असतो. त्या गरीब मुला ची म्हणजेच जब्या उर्फ जांबुवंत कचरू माने ची भूमिका साकारणारा अभिनेता ‘सोमनाथ अवघडे’ हा आहे. खऱ्या आयुष्यात देखील तो गरीब मेहनती होता मात्र चित्रपटात काम करून त्याचे नशीब बदलले.

सोमनाथ ने ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्याला नवीन शालू भेटली म्हणजेच नवीन अभिनेत्री त्याच्या सोबत आहे. ‘अपूर्वा शेळगावकर’ हि अभिनेत्री सोमनाथ सोबत चित्रपटात दिसली आहे. अपूर्वा ने यापूर्वी यंटम या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. सोमनाथ आणि अपूर्वा चा फ्री हिट दणका चित्रपट प्रदर्शित झाला असून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहूया.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *