नटरंग मधल्या गुना ची बायको आहे मोठी अभिनेत्री

मित्रानो नटरंग चित्रपट आला आणि खूप गाजला. नटरंग मधली गाणी तर लोकांच्या तोंडावर होती. अप्सरा आली हे गाणं अनेक लोक नेहमी ऐकत, मूली तर वार्षिक स्नेहसंम्मेलनात याच गाण्यावर डान्स करत होत्या. या चित्रपटात गुना ची भूमिका साकारणारा अभिनेता ‘अतुल कुलकर्णी’ विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. १० सप्टेंबर १९६५ ला बेळगाव ला अतुल चा जन्म झाला.

अतुल कुलकर्णी आता ५६ वर्ष्यांचा आहे मात्र तरी देखील खूप हँडसम दिसतो. अतुल ने अनेक मराठी हिंदी चित्रपटात काम केले आहे. प्रेमाची गोष्ट, सत्ता, नटरंग, हॅप्पी जर्नी सारखे अनेक मराठी सिनेमे केले. त्याने अनेक हिंदी आणि तामिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. १९९६ मध्ये त्याने ‘गीतांजली कुलकर्णी’ सोबत लग्न केले आणि संसाराला सुरुवात केली.

गीतांजली देखील दिसायला खूप सुंदर आहे आणि ती देखील एक अभिनेत्री आहे. तिने देखील अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हॉटस्टार मधील ‘आर्या २’ मध्ये देखील तिने काम केले आहे. सुशीला शेखर ची भूमिका तिने उत्तम बजावली असून ती त्या लूक मध्ये खूप आकर्षक दिसते. शर्ट आणि जीन्स वर तर तिने अनेक तरुणाच्या नजरा वळवल्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *