गॅरी ची खरी बायको शनाया आणि राधिका पेक्षा दिसते सुंदर

मराठी आणि हिंदी मालिका तुम्ही अनेक पाहिल्या असतील, अजून देखील पहात असाल. चित्रपट सृष्टीमध्ये येताना जास्तीत जास्त लोक शून्यातून वर येतात. काहीच लोक असे असतात जे डायरेक्ट हिरो म्हणून झळकतात. मालिकेत किंवा चित्रपटात छोटे मोठे अभिनय करणारे कलाकार पुढे जाऊन मुख्य भूमिकेत दिसू लागतात. हिरो चा प्रवास देखील खूप खडतर असतो.

आज आपण अश्याच एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे ‘अभिजित खांडकेकर’. सुरुवातीला अनेक नाटकांमध्ये काम केले, नंतर आरजे म्हणजं देखील त्याने काम केले. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शो मध्ये काम केल्यानंतर त्याने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम केले. त्यावर इम्रेस होऊन सुखदा ने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

सुखदा सोबत त्यांची मैत्री वाढली नंतर २०१३ मध्ये त्याने सुखदा सोबत लग्न केले. ७ जुलै १९८६ ला पुण्यात जन्मलेला अभिजित ३५ वर्ष्यांचा आहे. सुखदा हि कत्थक डान्सर आहे. सुखदाने ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात रणवीर सिंग च्या बहिणीचा रोल निभावला आहे. नाटकांमध्ये सुद्धा तिने काम केले आहे. सोशल मीडियावर ती खूप ऍक्टिव्ह असते आणि तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *