मराठमोळ्या सिद्धार्थ जाधव ची बायको पहा किती सुंदर

मराठी चित्रपट सृष्टी बॉलिवूड पेक्षा कमी नाही. अनेक असे मराठी कलाकार आहेत ज्यांची बॉलिवूड मध्ये खूप डिमांड आहे. सिद्धार्थ जाधव देखील त्यापैकी एक आहे. अनेक चित्रपटांमध्ये सिद्धार्थ ने काम केले आहे. जत्रा, दे धक्का, ढोलकी, प्रियतमा असे अनेक मराठी चित्रपट सिद्धार्थ ने गाजवले. बॉलिवूड मधील सिम्बा, राधे, गोलमाल सारख्या हिंदी मोठ्या चित्रपटांमध्ये सुद्धा तो झळकला आहे.

सिद्धार्थची ओळख आज भारतभर आहे. सिद्धार्थ चा जन्म रत्नागिरी मध्ये २३ ऑक्टोबर १९८१ मध्ये झाला. ४० वर्ष्यांच्या सिद्धार्थ ला २००७ मध्ये ‘युवा बालगंधर्व’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिद्धार्थ च्या बायकोचे नाव ‘तृप्ती जाधव’ आहे. तृप्ती देखील एक अभिनेत्री होती हे खूप कमी लोकांना माहित आहे. सिद्धार्थ आणि तृप्ती याना ‘स्वरा’ नावाची एक मुलगी आहे.

‘तृप्ती आकलवार’ हे तृप्ती च माहेरचं नाव होत. तृप्तीने पत्रकारितेचा कोर्स केला होता म्हणून ती जर्नालिस्ट देखील होती. एलिफ़िस्टन च्या रेल्वे स्थानकावर सिद्धार्थने तृप्तीला प्रपोस केलं. १० जुलै २००२ या तारखेला त्याने तृप्तीला प्रपोस केलं होत. प्रपोस सोबत त्याने तिला लग्न करणार का असे देखील तृप्तीला सांगितले. तिने त्यावेळी नकार दिला मात्र काही दिवसानंतर त्यांचं प्रेम बसलं आणि नंतर लग्न झालं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *