या कारणामुळे सिंधुताई याना अग्नी न देता पुरले गेले

सांगताना दुःख होते कि दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजून १० मिनीटांनी सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले त्याचे वय ७३ वर्ष होते. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे पुण्यामधील गॅलॅक्सी रुग्णालयात निधन झाले. सिंधुताई याना पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. त्यांचा जीवनप्रवास ऐकून तुम्हाला अश्रू आणणार नाहीत.

अशा महान व्यक्तीच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र तर दुखी झालाच पण अनेक महाराष्ट्रा बाहेरील जनता देखील त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करत होती. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच संपूर्ण सोशल मीडियावर त्यांचेच फोटो दिसत होते. व्हाट्सवर देखील सर्वानी त्यांना श्रद्धांजली वाहून फोटो शेअर केला. तुम्ही देखील ते केले असेल यात काही शन्का नाही.

पदमश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांनी एका कविता लिहली होती तिचे नाव “मला जाळू नका.. मातीत गाडून टाका”. या कवितेत त्यांनी असे सांगितले होते कि मला जाळू नका. यामुळेच त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला गेला नाही त्यांना मातीत एकरूप व्हायचे होते. अश्या या माउलीला लोक माई नावाने देखील हाक मारतात. त्यांनी अनाथांची खूप कष्ट केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *