मालिकेतील बाळूमामा झाला आहे या मुलीच्या मागे वेडा कोण आहे पहा ती

मित्रानो अनेक मालिका टीव्हीवर येतात आणि जातात. काही मालिका लोकांच्या मनात घर करतात तर काही मालिका कधी बंद होतील अश्या प्रतिक्रिया लोक देतात. अशीच एक मालिका बाळू मामाच्या नावानं चांगभलं हि आहे. कमी वेळात प्रसिद्धी या मालिकेने मिळवली आणि या मालिकेने लोकांच्या मनात घर केलं. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील मुख्य पात्र साकारणारा अभिनेता सुमित पूसावळे सध्या चर्चेत आला आहे.

सुमितचा जन्म दिघंजी या गावी झाला. सरगम चित्रपटामधून त्याने मोठ्या पडद्यावर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. इथे काम करत असताना हिंदी चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची नामी संधी देखील सुमितला मिळाली. यानंतर झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत काम करायची संधी सुमितला मिळाली. त्याने या मालिकेत सुम्याचे पात्र साकारले होते.

सध्या हाच बाळूमामा एका मुलीच्या मागे वेडा असल्याचे दिसून येते. नववर्षयाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुमितने एक फोटो शेअर केला होता त्यामध्ये त्याच्यासोबत एक मुलगी आहे. ती मुलगी देखील सुमितप्रमाणे एक अभिनेत्रीच आहे. दिशा परदेशी हे त्या मुलीचे नाव असून ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. ज्वेलरी आणि कपड्यांच्या ब्रँडसाठी दिशाने मॉडेलिंग केलं आहे. सुमीतनेच नाही तर दिशेने देखील दोघांचे एकत्र फोटो शेअर केलेले आहेत याहून त्यांचं नेमकं नातं काय हे त्यांनी अजून उघड केलेलं नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *