स्वामी समर्थ मालिकेतल्या या हिरोईन ने गुपचूप केला साखरपुडा

मित्रानो सध्या चर्चेत असलेली ‘जय जय स्वामी समर्थ’ हि मालिका लोकांनी खूपच पसंती दाखवली. आता या मालिकेतील एका अभिनेत्रीचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या मालिकेत कालींदी हे पात्र विरोधी भूमिका दर्शवत आहे. चांदुलेला नेहमी छळणारी कालींदी प्रेक्षकांच्या रागाला सामोरी जाताना दिसते. कालिंदीचे पात्र अभिनेत्री ‘पूजा रायबागी’ हिने साकारले आहे.

सर्वाना मालिकेत राग आणणारी पूजा रायबागी ही मराठी नाट्य, चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आहे. जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून तिला विरोधी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. अभिनेत्री पूजा रायबागी ही मुंबईतच लहानाची मोठी झाली. विविध नाट्यस्पर्धांमधून तिने सहभाग दर्शवला होता. २८ डिसेंबर २०२१ या दिवशी पूजा रायबागी हीचा प्रसाद डबके सोबत साखरपुडा संपन्न झाला.

या साखरपुड्याचे खास फोटो पूजाने सोशल मीडियावर अकाउंट वर शेअर केले आहेत. पूजा चा नवरा म्हणजेच प्रसाद डबके हा देखील अभिनेता आणि कलाकार आहे. प्रसादला फोटोग्राफीची आणि चित्रकलेची आवड देखील आहे. प्रसादने स्टार प्रवाहवरील नुकत्याच येऊन गेलेल्या जय भवानी जय शिवाजी या मालिकेत काम केले आहे. प्रसाद आणि पूजा याना त्यांच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *