रतन टाटांना केक चारणारा पोरगा कोण आहे साध्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस

टाटा कंपनीचे मालक रतन टाटा हे तर जगभरामध्ये त्यांच्या कामामुळे प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी तीन दिवसापूर्वी म्हणजेच २८ डिसेंबर २०२१ रोजी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस साजरा करताना एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. या व्हिडीओमध्ये रतन टाटा एका खुर्चीवर बसले असून ते टीपॉय वर ठेवलेला छोटा कप केक कापताना दिसत आहेत.

त्या छोट्या केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून नंतर रतन टाटा हा केक कापतात. त्यानंतर समोरच्या टेबलजवळ बसलेला तरुण रतन टाटांच्या बाजूला येऊन उभा राहातो आणि त्यांच्या खांद्यावरुन मायेनं हात फिरवतो. मुलगा खाली बसतो आणि कापलेल्या कप केकचा एक तुकडा रतन टाटांना भरवतो. प्रेमाने रतन टाटांना केक भरवणारा हा तरुण आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर हा तरुण ३० वर्षांचा आहे.

विशेष म्हणजे हा रतन टाटा यांचा कोणी नातेवाईक नाहीय असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्य वाटेल. या तरुणाचं रतन टाटांसोबत खास कनेक्शन आहे. रतन साहेबाना केक भरवणाऱ्या तरुणाचं नाव शंतनू नायडू आहे. शंतनू हा रतन टाटांचा पर्सनल सेक्रेट्री आहे. या तरुणाला स्वतः रतन टाटा यांनीच फोन करुन, “तू माझ्याबरोबर काम करणार का? असे सांगितले होते.

हा बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *