NMJOKE

शेजराणीचं भांडण बघून तुम्ही वेडे व्हाल

आपल्याकडे भांडण खूप प्रसिद्ध आहेत. कोणत्याही कारणावरुन भांडण होऊ शकतात. नळावरची भांडण, शेजारच्यांची भांडण तसेच घरातल्याच माणसांची भांडण अशी अनेक भांडण तुम्ही आजवर पाहिली असतील. भांडणारे खूप जोशमध्ये भांडत असतात आणि बघणारे त्याची तेवढीच मजासुद्धा घेत असतात. बघणाऱ्यांना बघायला आणि भांडण सोडवायला खूपच मजा येते. असाच एक नवीन भांडणाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्ही खूप हसाल.

हे भांडण दोन शेजारी राहणाऱ्या बायकांचे आहे. तुम्ही हा जर व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला तो पूर्ण पाहिल्याशिवाय राहवणार नाही. यामध्ये एका शेजारणीने दुसरीच्या घराच्या पायऱ्यांवर पाणी टाकले म्हणून भांडायला चालू केले आहे. आता बायकांची भांडण म्हणलं की सगळा इतिहास, वर्तमान तसेच भविष्यकाळ सुद्धा त्या भांडणातून कळतो. तसेच इथेही आहे. दोघींच्याही घरातील सर्व गोष्टी चारचौघात समजल्या तेही त्यांच्या भांडणामुळे.

दोघी अगदी जोशात भांडत आहेत, कोणीही थांबायचं नाव नाही घेत आणि शेवटी तर त्या मारामारी सुद्धा करायला उठल्या आहेत. त्यात एकीचा दिर त्यांची भांडण सोडवत आहे. त्यांच्यातील बोलणे खूपच हसण्यासारखे आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप मनोरंजक आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हीही असे व्हिडिओ किंवा खरे प्रसंग पाहिले असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

 

Exit mobile version