स्टार प्रवाहवरील सुप्रसिद्ध मालिका ‘रंग माझा वेगळा’ ही दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. मालिकेत अनेक नवीन नवीन पात्र येत आहेत आणि मालिकेची शोभा वाढवत आहेत. कार्तिक आणि दिपा यांना एकत्र येण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत आणि त्यातलीच एक अडचण म्हणजे आयेशा ही आहे. आयेशाला सौंदर्या इनामदारच्या पूर्ण घराची वाईट अवस्था करायची असते.
त्यामुळे ती कार्तिकला तिच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण याच आयेशाच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याबरोबरच तिची बहिणीही किती सुंदर दिसते हे पाहून आहोत. आयेशाचे खरे नाव विदीशा म्हसकर असे आहे. तिचा जन्म २६ मार्च १९९१ ला झाला. आयेशा ही महाराष्ट्रातील महाड या गावची आहे.
तिला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे तिने पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. रामनरेन रुईया कॉलेज, माटुंगा येथून तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तिने कॉम्पुटर सायन्स मधून एमएससी ची पदवी प्राप्त केली आहे. ‘हे मन बावरे’ या मालिकेपासून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली.
‘दहा बाय दहा’ यामध्येही तिने अभिनय केला आहे. तिच्या बहिणीचे नाव मधुरा म्हसकर आहे. जर तुम्ही पाहाल तर तुम्हालाही वाटेल की मधुरा ही विदीशा पेक्षा खूप सुंदर दिसते. मधुरा सध्या शिक्षण घेत आहे. तुम्हालाही मधुरा कशी वाटते? विदीशा पेक्षा मधुरा सुंदर आहे का? तुमची मते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.