दोन वेळा लग्न करून बसलेत हे कलाकार

सामान्य जीवनात आता बऱ्याच ठिकाणी नवरा आणि बायकोचे पटत नसल्याने घटस्फोट होत आहेत. सिनेसृष्टीतील घटस्फोटचे प्रमाण खूपच वाढले. घटस्फोट घेण्यामागे बरीचशी कारणे असू शकतात. बाकीचे लोक कितीही काहीही बोलले तरी शेवटी नवरा बायकोलाच आयुष्यभर एकमेकांना साथ द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही अनेकांनी दोन लग्ने केलेली पाहिले असेल. अशीच काही सिनेसृष्टीतील कलाकारांची नावे आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांनी सुद्धा दोन लग्ने केली आहेत.


१) पियुष रानडे: हे नाव तुमच्या परिचयाचे असेलच. पियुषने पहिले लग्न शाल्मली टोल्ये बरोबर केले आहे. शाल्मली ही सध्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत लावण्या म्हणजेच कार्तिकच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. मयुरी वाघ हे त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव आहे. २) सोनाली कुलकर्णी: उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून सोनालीची कुलकर्णीची ओळख आहे. चंद्रकांत कुलकर्णी हे तिच्या पहिल्या पतीचे नाव आहे. तिच्या दुसऱ्या पतीचे नाव नचिकेत पंतवैद्य आहे आणि त्यांना आता एक मुलगीही आहे.
३) महेश मांजरेकर: मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत गाजलेले नाव म्हणजे महेश मांजरेकर यांचे आहे. महेश यांनीही दोन लग्ने केली आहेत. दीपा मेहता हे महेश यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. दुसरी पत्नी म्हणजेच मेधा मांजरेकर यांना आता सर्वचजण ओळखतात. यांना एक मुलगीही आहे जी आता सिनेसृष्टीत तिचे पाऊल ठेवत आहे.


४) रेणुका शहाणे: अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. रेणुका यांच्या पहिल्या पतीचे नाव विजय केनकरे आहे तर दुसऱ्या पतीचे नाव आशुतोष राणा असे आहे. हे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. ५) शर्मिष्ठा राऊत: मराठी बिग बॉस मध्ये तुम्ही शर्मिष्ठाला पाहिले असेल की तिने किती उत्तम पद्धतीने तो खेळ पार पाडला. शर्मिष्ठाचीही दोन लग्ने झाली आहे त्यातल्या पहिल्या पतीचे नाव अमेय निपणकार तर दुसऱ्याचे नाव तेजस देसाई असे आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या भावना कमेंटद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *