कार्तिकचे वडील आहेत मोठे अभिनेते

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका काही दिवसांतच लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत कार्तिक आणि दीपा यांचा घटस्फोट होणार की ते पुन्हा एकत्र येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांचाही घटस्फोट होऊ नये म्हणून कार्तिकची आई म्हणजेच सौंदर्या ही आटोकाट प्रयत्न करत आहे. पण तुम्हाला वाटते का की सौंदर्याच्या या प्रयत्नांना यश येईल? ते आपल्याला येणाऱ्या भागांत समजेलच.

आज आपण येथे कार्तिकच्या खऱ्या आयुष्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. कार्तिक हा नक्की कोणाचा मुलगा आहे हे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कार्तिकची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आशुतोष गोखले आहे. आशुतोष या खऱ्या आयुष्यात खूप समजूतदार आणि संवेदनशील व्यक्ती आहे.

पाणी फाउंडेशन मध्ये त्याने श्रमदान केले आहे तसेच अनेक ठिकाणी त्याने समाजसेवा सुद्धा केली आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने अनेक गरिबांना मदतही केली आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे आशुतोष खूप प्रसिद्ध झाला आहे. आशुतोष हा खऱ्या आयुष्यात एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे. त्याच्या वडिलांचे नाव आहे अभिनेता विजय गोखले.

विजय गोखले यांना तर तुम्ही ओळखतंच असाल. यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांची मालिका तसेच चित्रपटामधून करमणूक केली आहे. आशुतोषचा मामेभाऊ सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेता आहे ज्याचे नाव अद्वैत दादरकर आहे जो आधी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अभिनय करत होता तर आता ‘आग्गबाई सुनबाई’ या मालिकेत काम करतो.

आशुतोषला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी घरात पोषक वातावरण होते पण त्याला क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते. पण दुखापतीमुळे तो नंतर क्रिकेट खेळू शकला नाही. कॉलेजमध्ये असताना काही एकांकिका केल्यानंतर त्याला अभिनय आवडू लागला आणि त्यातच पुढे जायचे असे त्याने नंतर ठरवले. तुम्हालाही कार्तिक म्हणजेच आशुतोष गोखले कसा वाटतो हे आम्हाला कळवायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *