या गावठी मुली कधी शाळेत नाही गेल्या पण त्यांचं इंग्लिश ऐकून तुम्हाला घाम फुटेल

आपला देश हा विकसनशील देश आहे त्यामुळे देशात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यांमध्ये अजूनही सुधारणा होत आहे. अजूनही भारतातील सर्वच जनता ही सुशिक्षित नाही. देशातील गरिबी, बेरोजगारी यांमुळे बऱ्याच लहान मुलांना शाळेत जायला किंवा अभ्यास करायला मिळत नाही. परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर यामध्ये ज्या दोन महिला इंग्लिश बोलत आहेत त्या शिकलेल्या आहेत असे तुम्हाला वाटेल.

पण मित्रांनो, या दोन्ही महिला शाळेत गेल्या सुद्धा नाहीत तरीही त्या इतक्या चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकतात. रोज काम केले तर पैसे मिळणार आणि पोट भरेल अशी यांची परिस्थिती आहे. पण ज्यावेळी त्या इंग्लिश बोलतात त्यावेळी एका शिकलेल्या व्यक्तीला सुद्धा त्या टक्कर देतील. महत्वाचं म्हणजे बऱ्याच शिकलेल्या व्यक्तींना अजूनही इंग्लिश बोलता नाही येत.

या दोघींची नावे सुनीता आणि सिंदुरी अशी आहेत. ज्यावेळी पुष्कर मध्ये जत्रा होती तेव्हा हा व्हिडिओ शूट केला आहे. या दोघींनाही इंग्लिश बोलता येते आणि त्याबरोबरच समोरचा इंग्लिशमध्ये काय बोलत आहे हे सुद्धा त्यांना समजते आहे. स्वतःच घर नसलेल्या आणि एका तंबूमध्ये राहणाऱ्या या महिलांची हुशारी कौतुकास्पद आहे.

ज्यावेळी या काम करतात तेव्हा बाकी लोकांकडून म्हणजेच परदेशी व्यक्तींकडून जे फिरायला येतात त्यांकडून यांनी इंग्लिश शिकलेले आहे. त्यामुळे कधीही कोणत्या लोकांना कमी समजू नये. कोण कोणत्या गोष्टीत हुशार असेल हे तुम्ही सांगू नाही शकत. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर आमच्याबरोबर नक्की शेअर करा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *