NMJOKE

दिसायला जरी चांगली नसली तरी हीच बोलणं ऐकून तिच्या प्रेमात पडाल

भारत ज्याप्रमाणे विविधतेत नटले आहे त्याप्रमाणेच भारतात बुद्धिमान, कुशल आणि हुशार माणसांची पण कमी नाही. तुमच्यासाठी आज एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्ही तो बघतच राहाल. साधारपणे सर्वचजण वयानुसार शिक्षण घेत असतात आणि पुढे जाऊन नोकरी करतात किंवा जे काही त्यांना करिअरमध्ये करायचे असेल ते करतात.

परंतु या व्हिडिओमधील ही मुलगी चक्क १३ व्या वर्षी १२वी पास झाली आणि १३ व्याच वर्षी तिने पदवीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश सुद्धा घेतला. आता ती १५ व्या वर्षी दिल्ली विद्यापीठामधून पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात आहे. या मुलीचे नाव जान्हवी पवार आहे. जान्हवी ही हरियाणाची आहे. जान्हवीने एकूण नऊ भाषेत बोलण्याचे कौशल्य मिळवले आहे.

ब्रिटिश, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, स्कॉटिश, कॅनेडियन, फ्रेंच, जॅपनीज अशा अनेक भाषा बोलते. तिची बोलीभाषा म्हणजेच घरी असताना ते हरियाणाची भाषा बोलतात. जान्हवीने या सर्व भाषा कुठेही क्लास लावून शिकल्या नसून तिने स्वतः ऑनलाइन शिकल्या आहेत. ९ वर्षांची असताना तिने वेगळ्या वेगळ्या भाषा शिकायचे चालू केले होते.

या वयात असताना मुलांना अजून कसे खायचे, राहायचे हे सुद्धा नाही समजत. २ वर्षात तिने ४ भाषा शिकल्या म्हणजेच ११ व्या वर्षी तिला चार वेगळ्या वेगळ्या भाषा बोलायला येऊ लागल्या. जान्हवी खरंच खूप हुशार आहे. तुम्हालाही तिच्या या बुद्धिमत्तेविषयी काय वाटते, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version