Home / कलाकार / यामुळे सोहंम ने सोडली मालिका

यामुळे सोहंम ने सोडली मालिका

काही दिवसांपूर्वीच ‘आग्गबाई सुनबाई’ ही नवीन मालिका चालू झाली. या मालिकेतील पात्रांची नावे ही आधी सुरू असलेल्या ‘आग्गबाई सासूबाई’ या मालिकेतीलच आहेत परंतु अभिनय करणारे बरेच कलाकार हे या मालिकेत नवीन आहेत. सोहम ही एक या मालिकेतील महत्वाची व्यक्तिरेखा आहे. सोहमची भूमिका अभिनेता अद्वित दादरकर साकारत आहे.

अद्वितने याआधी माझ्या नवऱ्याची बायको यामध्येही अभिनय केला आहे. साधारपणे आपण सर्वचजण सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो आणि बऱ्याच पोस्टसुद्धा टाकतो आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना हे तर खुप सवयीचे आहे. ते आपल्या चाहत्यांसाठी त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अद्वित सुद्धा सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह राहून त्याच्या चाहत्यांना त्याच्या अपडेट देतो. त्याच्या भूमिकेविषयी आणि खाजगी आयुष्यातील गोष्टी तो शेअर करत असतो. त्याचे खूप फॉलोवर्स आहेत पण आता त्यांच्यासाठी एक निराशेची गोष्ट आहे. अद्वितने इन्स्टाग्राम या सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे आणि परत कधी येणार याबद्दल काही बोलले नाही.

त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल अपडेट नाही मिळू शकणार. अद्वितला सोशल मीडियाचा कंटाळा आला होता. तसेच त्याला सोहम या भूमिकेमुळे अनेकांच्या टीकांना सामोरे जावे लागत होते. जेव्हा या मालिकेतील सोहमचा पहिल्यांदा लुक समोर आला तेव्हा प्रेक्षकांचा हिरमुड झाला होता.  ‘अकाउंट डीऍक्टिवेट करत आहे.

माहीत नाही किती काळासाठी. परत येईन. मी ओके आहे त्यामुळे काय झाले विचारायला फोन करू नये.’, अशी पोस्ट अद्वितने केली आहे. तुम्हालाही अद्वित कितपत आवडतो आणि त्याने परत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह व्हावे का? याबद्दलचे तुमचे मत आम्हाला नक्की सांगा.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.