Home / कलाकार / मोहित ची बायको आहे एवढी सुंदर

मोहित ची बायको आहे एवढी सुंदर

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने अगदी कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अनेक मालिका येतात जातात आणि त्याबरोबरच अनेक अभिनेता आणि अभिनेत्रीही. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यातील त्यामागचे कष्ट हे आपल्याला कधी त्या मालिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनयावरून समजत नाही. या मालिकेतील मोहित ही भूमिका तुम्हाला माहीतच असेल.

मोहितचे खरे नाव अभिनेता निखिल राऊत आहे. निखिलने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे. निखिलचा अभिनय जेवढा उत्तम आहे त्यामागे त्याने तेवढे कष्टही घेतले आहेत. निखिलच्या घरची परिस्थिती ही बेताची होती. काही कारणास्तव निखिलच्या वडिलांची नोकरी गेली आणि घरात अजून पैशांची अडचण भासू लागली.

घरखर्चात मदत व्हावी म्हणून वडिलांनी दिलेल्या सायकलवर जाऊन तो दूध विकत असे. तेव्हापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे आणि यामध्ये त्याला त्याच्या आईने पाठिंबा दिला. त्यामुळे आता तो जो काही आहे त्यामागे त्याच्या आईचा हात आहे असे तो म्हणतो. गेले सतरा अठरा वर्षे झाले तो अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

अभिनयाबरोबरच त्याला जेवण बनवायचीही आवड आहे आणि तो अनेक पोस्टही शेअर करत असतो. २२ एप्रिल २०१४ मध्ये निखिलने मयुरीबरोबर लग्न केले. ती एक क्लासिकल डान्सर आहे आणि वेडींग प्लॅनर सुद्धा आहे. मयुरी ही दिसायलाही खूप सुंदर आहे आणि निखिल आणि मयुरीची यांची जोडी साजेशी आहे. तुम्हालाही या दोघांची जोडी कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका.

About nmjoke.com

Check Also

दिसायला जरी चांगली नसली तरी हीच बोलणं ऐकून तिच्या प्रेमात पडाल

भारत ज्याप्रमाणे विविधतेत नटले आहे त्याप्रमाणेच भारतात बुद्धिमान, कुशल आणि हुशार माणसांची पण कमी नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *