अभ्यास करत नव्हता मुलगा मास्तरांनी काय केले पहा

मुलेमुली लहान असली की शाळेत जाताना किंवा अभ्यास करताना नेहमी काहीतरी नाटक करत असतात आणि हे तुम्ही सर्वांनी अनुभवले असेल. तुम्हीही स्वतः लहानपणी असे काहीतरी नक्कीच केले असेल. आठवून चेहऱ्यावर हसू आले ना? काही मुलांना अभ्यास तसेच शाळा म्हणले की, पोटात दुखू लागते. हाहा!! काही खोडकर मुलं अभ्यास सुद्धा नाही करत मग त्यामागचे कारण विचारले तर अनेक मजेशीर गोष्टी ऐकायला मिळतात.

अशा मुलांना कसे नीट करायचे हे शिक्षकांना चांगलेच समजते. असाच एक लहान आणि खोडकर मुलाचा मजेशीर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडिओतील मुलाने दिलेला अभ्यास केला नव्हता आणि तो नेहमी असं करताना दिसला त्यामुळे शिक्षकाने त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

शिक्षकाला माहीत असते की, लहान मुलांना इंजेक्शनची भीती वाटते आणि त्याचीच भीती या मुलाला दाखवली आहे. मुलाला जेव्हा इंजेक्शन दाखवले तेव्हा तो रडू लागला आणि तो गृहपाठ नक्की करणार असे सांगत आहे. कालचा अभ्यास केला नाही त्याच काय विचारल्यावर तो म्हणतो की ते राहुद्या आता आजचा अभ्यास तो नक्की करेल.

इथून पुढे अस नाही होणार. आजही घरी गेल्यावर दुसरं काहीच करणार नाही लगेच अभ्यासाला घेईल आणि पूर्ण करेल. आज फक्त सोडा. खरंच, हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा. तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=u6GaujOkiX0

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *