Home / कलाकार / सौंदर्याचा बॉयफ्रेंड पहा कोण आहे

सौंदर्याचा बॉयफ्रेंड पहा कोण आहे

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिकांमध्ये ‘रंग माझा वेगळा’ ही एक मालिका आहे. या मालिकेत सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा दमदार आहे. मालिकेमध्ये सौंदर्या हीने स्वतःच्या हिमतीवर कंपनी उभा केली आणि आयुष्यात यशस्वी झाली. आज याच सौंदर्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल आपण येथे माहिती करून घेणार आहोत. अभिनेत्री हर्षदा खानविलकर हे सौंदर्याचे खरे नाव आहे.

हर्षदा या मूळच्या मुंबईच्या असून त्यांचा जन्म २ जुलै १९७३ ला झाला. हर्षदा यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये अभिनय केला आहे. अभिनयाबरोबरच त्या एक डायरेक्टर आणि कॉस्टुम डिझायनर आहेत. किंग जॉर्ज स्कूल, मुंबई येथून शालेय शिक्षण पूर्ण केले तर हायस्कुल शिक्षण रुपारेल कॉलेज, मुंबई येथून पूर्ण केले.

१९९९ साली आलेली ‘आभाळमाया’ या मालिकेमध्ये पहिल्यांदा त्या छोट्या पडद्यावर झळकल्या. ‘डोंबिवली फास्ट’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. याबरोबरच त्यांच्या उत्तम अभिनयामुळे त्यांना अनेक मालिका मिळत गेल्या. ‘बिग बॉस मराठी सीजन १’ मध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. चला तर मग जाणून घेऊया हर्षदा यांच्या कुटुंबाबद्दल थोडेफार.

संजय जाधव हे हर्षदा यांच्या नवऱ्याचे नाव आहे. या दोघांचा संसार सुखाने चालला आहे आणि यांचे एकमेकांवर खूप प्रेमही आहे. दोघांनाही ध्रीती आणि मृणाल या नावाच्या दोन सुंदर मुली आहेत. तुम्हालाही हर्षदा खानविलकरचा अभिनय कसा वाटतो? हे आम्हाला कळवायला विसरू नका. तुम्ही लाईक आणि शेअर देखील करा यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.