दे’वमाणूस मधला हा अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी तेवढे कष्टही घ्यावे लागतात. काही व्यक्तींना जन्मजात श्रीमंती असते त्यामुळे अशा लोकांना यशस्वी होण्यासाठी तेवढी झळ सोसावी लागत नाही जेवढी गरीब माणूस सोसतो. खूप कष्ट केल्यावर कुठे अशा माणसांना दोन वेळचे जेवण मिळते. आपल्या टीव्ही क्षेत्रातही असे अनेक कलाकार आहेत जे खूप कष्ट करून जीवन जगत आहेत.

थोड्या कालावधीतच प्रसिद्धीस आलेली ‘दे’वमाणूस’ ही झी मराठीवरील मालिका तुम्हाला माहीतच असेल. तुम्हीही याचे नवनवीन एपिसोड कधी येतील आणि तो कधी बघतो याची वाट बघत असाल. ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमध्ये ‘दे’वमाणूस’ या मालिकेतील कलाकार आले होते. या मालिकेतील अनेक कलाकारांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील काही घ’टना सांगितल्या.

त्यातलीच ‘दे’वमाणूस’ या मालिकेतील बज्या हे पात्र आहे. ज्यावेळी बज्याने त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल सांगितले तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. बज्याचे खरे नाव अभिनेता किरण डांगे आहे. किरण हे पोट भरण्यासाठी आधीही कल्याण मध्ये रिक्षा चालवत होते तसेच आजही एक अभिनेता असून रिक्षा चालवत आहेत.

कोणतेही काम करायला कधी लाजायचे नाही हे आपल्याला यातून समजते. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते आणि माणूस घडत राहतो. तुम्हालाही किरण यांच्या बद्दल तसेच त्यांच्या अभिनयाबद्दल काय वाटते हे आम्हाला नक्की कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *