का काढला सैराट च्या लंगड्याने न’ग्न फोटो

सैराट हा २०१६ मध्ये चित्रपट आला आणि त्याने मराठी सिनेसृष्टीला अक्षरशः हादरवून सोडलं. हा चित्रपट म्हणजे, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ होय. या चित्रपटात काम करणाऱ्या सर्वच कलाकारांना अमाप लोकप्रियता मिळाली. रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अरबाज शेख आणि तानाजी गळगुंडे यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.

 

तसेच त्यांच्या करिअरला एक नवी दिशा देखील मिळाली. यातला तानाजी अर्थातच ‘लंगड्या’ या दिवसांत चर्चेत आला आहे. या चर्चेचं कारणही तितकंच चकित करणारं आहे. खरं तर तुम्हालाही हे ऐकून धक्का बसेल. नुकतंच तानाजीचा एक फोटो समोर आला आहे. आता तुम्ही म्हणाल की, यात काय विशेष? तर विशेष म्हणजे, हा एक न्यू’ड अर्थातच न’ग्न फोटो आहे.

होय तानाजीचा न’ग्न फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या फोटोत तुम्ही पाहू शकता की, तानाजी पूर्णपणे उघडा असून एक गिटार घेऊन थांबला आहे. ‘सैराट’मध्ये गावंडळ मुलाची भूमिका साकारणाऱ्या तानाजीचा हा बो’ल्ड अवतार पाहून, सर्वांनीच तोंडात बोटं घातली आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “माझे पाय तर योग्य रचनेत नाहीयेत, पण माझं संगीत आहे…!

मी माझ्या स्वतःच्या रचना करण्यात चांगला आहे… कारण मी मी आहे!” या फोटोने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वनिता खरातने देखील असंच न्यू’ड फोटोशूट केलं होत. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत आता तानाजीने देखील हे फोटोशूट केलं आहे. महत्वाचं म्हणजे, ‘शरीराची सकारात्मकता’ या खास विषयावर हे फोटोशूट केलं गेलं आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *