दिव्या मालिकेत दिसणार नाही कारण डॉ’क्टर ने तिला

आताच्या वेळेमध्ये टीव्हीवर देव माणूस ही मालिका प्रचंड गाजत आहेत. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना खूप भावत आहेत. या मालिकेमध्ये एसीपी दिव्या सिंहची भूमिका मराठमोळ्या नेहा खान हिने साकारलेली आहे. नेहा खान ही मूळची अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. याबाबत अलीकडेच खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल झालेल्या आहेत. नेहा खान हिने खूप मोठ्या कष्टानंतर बॉलीवूड आणि मराठी मालिकांमध्ये आपले करियर केले आहे.

 

यासाठी तिने अपार मेहनत केली आहे. काही दिवसापूर्वी याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये नेहा खान हिने तिच्या लहानपणी भोगलेल्या कष्टाची माहिती देण्यात आली होती. नेहा खान हिने त्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, माझ्या आईला तिच्या वडिलांकडच्या लोकांनी मारहाण केली होती. त्यामुळे तिला ३७० टाके पडले होते.

हा वाद संपत्तीचा होता. त्यानंतर माझी आई घरी होती. त्यामुळे मला आणि माझ्या भावाला देखील काम करावे लागले होते. आम्ही रस्त्यावर जाऊन कुल्फी विकत होतो, असे ती म्हणाली. माझ्यासोबत माझा भाऊ देखील असायचा. मात्र, कालांतराने मी मुंबईला पळून आले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये मी माझे फोटोग्राफ दिले. त्यानंतर मला काही जाहिराती मध्ये संधी मिळाली. त्यानंतर मला देव माणूस ही मालिका मिळाली.

आता ही मालिका चांगलीच गाजत आहे. असे असले तरी नेहा खान आता ही मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगात आहे. याचे कारण आता समोर आलेले आहे. देव माणूस मालिकेत डॉक्टर अजित कुमार देव याचे पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. हे पात्र किरण गायकवाड या अभिनेत्याने साकारलेले आहे. या आधी त्याने लागीर झालं जी या मालिकेत देखील निगेटिव्ह भूमिका साकारली होती.

आता देव माणूस मधील त्याची खलनायकी भूमिका सगळ्यांनाच खूप आवडत आहे. नेहा खान ही मालिका का सोडणार हे आता स्पष्ट झाले आहे. कारण बिग बॉस मराठी 3 मध्ये ती दिसणार आहे. आणि या सेशन साठी नेहा खान ही मालिका सोडणार असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नेहा खान बिग बॉस मध्ये लवकरच दिसणार आहे, असेही सांगण्यात येते. या मालिकेत नेहा खानच्या जागी इन्स्पेक्टर शिंदेची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता या मालिकेत अजित कुमार देव सुटतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण करी कहाणी पाहता दादर येथे त्याला पकडले गेले होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *