हि मुलगी उडवते फायटर विमान पाहून गर्व वाटेल

तुमच्यासाठी आज एक अशी माहिती घेऊन आलो आहे जी वाचून तुम्हाला नक्कीच या मुलींचा गर्व वाटेल. महिलांना आधी बाहेर काम करून देत नव्हते कारण महिला त्या करू शकणार नाहीत असे सगळ्यांना वाटे. परंतु आता महिलांना खूप साऱ्या नोकरी करण्यासाठी संधी आणि सुविधासुद्धा दिल्या जातात. त्यातलीच ही एक गोष्ट आहे.

फायटर विमान उडवण्यासाठी आधी महिलांना परवानगी नव्हती परंतु आता ती देण्यात आली आहे. लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी या मुलीने पहिल्यांदा फायटर विमान उडवले. अवनीबरोबर मोहना जितरवाल आणि भावना कांत या दोघींनाही ही संधी मिळाली आहे. ज्यावेळी यांनी भारतीय वायुसेनामध्ये प्रवेश केला त्यावेळी सरकारने निर्णय दिला की आता महिला सुद्धा फायटर विमान उडवू शकतात.

या तिघींच्या हुशारी आणि कौशल्याला पाहून यांना फायटर विमान उडवण्याची परवानगी दिली. आपण आज याच अवनीबद्दल माहिती घेणार आहोत. तिचा जन्म २७ नोव्हेंबर १९९३ ला झाला. अवनी ही मूळची मध्यप्रदेशची आहे. २०१६ मध्ये अवनीची भारतीय वायुसेनेमध्ये निवड झाली. हैदराबाद तसेच कर्नाटक येथे भारतीय वायुसेनेसाठी अवनीने प्रशिक्षण घेतले आहे आणि बऱ्याच अडीअडचणींनंतर तिला आज हा मान मिळाला आहे.

‘मिग २१’ विमान हे जगातले सर्वांत वेगाने चालणारे विमान आहे. हे विमान उडवण्याची सर्वांना परवानगी दिली जात नाही परंतु हे विमान पायलट अवनीने वयाच्या २४ व्या वर्षी उडवले. ही खरंच आश्चर्याची आणि गर्वाची गोष्ट आहे. आज अवनीला पाहून लहान मुलीना सुद्धा वाटत असेल की आपण सुद्धा हा गणवेश घालावा आणि देशाची सेवा करावी. पालकांना सुद्धा आपल्या मुलींना मोठी झाल्यावर अशी देशसेवा करावी असे वाटत आहे. तुमचे अवनीबद्दल काय मत आहे? तुम्हालाही तिचा अभिमान वाटतो का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=pq6B_ps65XM

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *