सारेगमप मधील या छोट्या चे ठरले लग्न बायको पहा किती सुंदर आहे

गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर हे प्रेक्षकांचे आवडते जोडपे आहे. रोहित हा महाराष्ट्रातील लातूरचा आहे. आपण रोहितला ‘इंडियन आयडल सीजन ११, सारेगमप लिटल चम्प्स’ मध्ये सुद्धा पाहिले आहे. ‘सांग तू आहेस का, माझा होशील ना, का रे दुरावा’ अशा अनेक मालिकांसाठी रोहितने गायले आहे.

‘मोगरा फुलला’ या चित्रपटाचा तो संगीत दिग्दर्शकही आहे. जुईली हिने सुद्धा आजपर्यंत बरीच गाणे गायली आहेत. ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोमध्ये सुद्धा तिने सहभाग घेतला होता. या दोघांनी जेव्हा कधी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले तेव्हा चाहत्यांच्या लाईक्सच वर्षाव होत असतो. एकदा जुईलीने सोशल मीडियावर हळदीचा फेसपॅक लावून पोस्ट केला.

तेव्हा चाहत्यांना असे वाटले की हा जुईलीच्या हळदीचा फोटो आहे आणि त्यांचे लग्न होणार आहे. परंतु तसे काही नव्हते पण आता जुईलीने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. तिने सांगितले आहे की, रोहित आणि ती नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना नोव्हेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे. मित्रमैत्रिणीनो, तुम्हालाही रोहित आणि जुईलीची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *