या अभिनेत्रीला निर्मात्याने खोलीत डांबून ठेवलं होत

यशस्वी ठिकाणी पोहचायचे असेल तर त्यामागे त्या व्यक्तीचे खूप कष्ट आणि संघर्षमय कहाणी असते. यश हे सहजासहजी मिळत नाही आणि ते मिळवण्यासाठी हार पचवणे आणि पुन्हा नव्याने उभा राहणे हे खूप महत्वाचे असते. सिनेसृष्टीतील अनेक अभिनेता अभिनेत्री आपली रोज करणमूक करत असतात आणि त्यासाठी ते कष्ट सुद्धा घेतात जेणेकरून तुम्हाला ती व्यक्तिरेखा हुबेहूब वाटावी.

या कलाकारांना सुद्धा अनेक चांगल्या वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यांच्या घरातही अनेक ताणतणाव असू शकतात परंतु जेव्हा ते अभिनय करतात तेव्हा ते कधीही आपल्याला दिसत नाही. आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल माहिती करून घेणार आहोत जी ऐकल्यावर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही.

 

एक विनोदी कलाकार म्हणून अभिनेत्री सुप्रिया पाठारे या सुप्रसिद्ध आहे. सुप्रियाने आजपर्यंत अनेक चित्रपट आणि मालिका केल्या तसेच अनेक नाटकेही केली आहेत. आज त्यांना मराठी मनोरंजन क्षेत्रात विनोद सम्राग्नि म्हणून ओळखले जाते. एका मुलाखती दरम्यान त्यांनी असे सांगितले की, त्यांना एका चित्रपट निर्मात्याने एका खोलीत डांबून ठेवले होते.

त्या खोलीत जवळपास सुप्रिया ३ महिने बंद होत्या. त्यांना फक्त घरच्यांना बोलायची संधी दिली जायची आणि तेही हिंदी मध्ये बोलायचे असे सांगितले होते. एकदा संधी मिळताच सुप्रिया यांनी हा सर्व प्रकार त्यांच्या बहिणीला सांगितला. घरच्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेतली आणि निर्मात्याच्या तावडीतून सुप्रिया यांना सोडवले.

परंतु अभिनयाची आवड असल्याने त्यांनी कधी अभिनय करणे बंद केला नाही. त्या अजूनही आपल्याला हसवतात आणि चांगल्या अभिनयाने आपली करमणूक करतात. या अशा सुन्न करणाऱ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटते, कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *