वयाच्या ४८ व्या वयात या मराठी अभिनेत्याने केलं दुसरं लग्न

लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकार हे लग्न करत आहेत आणि लग्न झाल्यानंतर आपल्या चाहत्यांना ते एक पोस्ट टाकून सुखद धक्का देत असतात. मराठी चित्रपटसृष्टीत तसेच छोट्या पडद्यावर आपली चांगली छाप टाकणाऱ्या यादीतील अभिनेते केदार शिंदे हे एक आहेत. केदार शिंदे यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि नाटके केली आहेत.

 

त्यांनी बऱ्याच मालिका, नाटके तसेच चित्रपटांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. केदार शिंदे यांचे लग्न आधी एकदा लग्न झाले आहे परंतु १० मे ला त्यांनी अजून एकदा लग्न केले आहे. २५ वर्षांपूर्वी केदार यांनी बेला शिंदे यांच्याबरोबर लग्न केले होते. त्यांना एक मुलगीही आहे. पण हा दुसऱ्या लग्नाचा प्रकार नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

१० मे ला केदार आणि बेला यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाले त्यामुळे त्या दोघांच्या मुलीने या गोष्टीची संधी साधून त्यांचे अजून एक लग्न लावायचे असा हट्ट धरला. त्यामुळे लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी अजून एकदा पूर्ण विधीप्रमाणे लग्न केले. या लग्नसोहळ्याला मोजकीच माणसे उपस्थित होती तर काहीजण व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आनंद घेत होते.

 

बेला शिंदे यांचे कन्यादान अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या जोडीने केले. या लग्नात सिद्धार्थ जाधवने सुद्धा मनमुराद नाचून घेतले. या दोघांच्याही पुढच्या आयुष्याला आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि यांची जोडी अशीच एकत्र राहो की सदिच्छा.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *