Breaking News
Home / कलाकार / हि आहे अनघा ची जीवन कहाणी

हि आहे अनघा ची जीवन कहाणी

‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता घराघरांत पोहचली आहे. रोज या मालिकेची वेळ झाली की घरातले सर्वजण ही मालिका बघायला बसतात. कधी एकदा ही मालिका लागते आणि पुढचा एपिसोड बघतो याकडे सर्वांचे लक्ष असते. या मालिकेमध्ये सर्वच कलाकार हे खूपच मेहनत घेऊन काम करत आहेत आणि त्याचेच हे फळ आहे.

काही दिवसांपूर्वी अनघा ही व्यक्तीरेखा या मालिकेत दाखवली जाऊ लागली. ज्यावेळी आजोबा अरुंधतीला घेऊन बागेत जातात तेव्हा अनघा तिच्या ओळखीची होते. आता अभिषेकला सुद्धा अनघा खूप आवडत आहे आणि तिच्याबरोबर लग्न सुद्धा करायचे आहे. परंतु या दोघांनाही एकत्र यायला खुप अडथळे येत आहेत. आपण आज याच अनघाच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहिती घेणार आहोत.

अश्विनी महंगाडे हे अनघाचे खरे नाव आहे. अश्विनी ही अभिनेत्री तर आहेच बरोबरच मॉडेलिंग सुद्धा करते. तिचा जन्म २७ ऑक्टोबर १९८८ ला महाराष्ट्रातील सातारा येथे झाला. श्री भैरवनाथ विद्यालय, पुणे येथुन तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. हायस्कुल शिक्षण हे किसनवीर महाविद्यालय, वाई येथून पूर्ण झाले. तिने कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.

२०१४ मध्ये ‘अस्मिता’ या मालिकेतून तिने टीव्हीक्षेत्रात पदार्पण केले. ‘टपाल, बॉईज’ या चित्रपटात सुद्धा तिने अभिनय केला आहे. मालिका आणि चित्रपट यांबरोबरच तिने नाटकात सुद्धा काम केले आहे. ‘आधी बसू मग बोलू’ यामध्येही ती दिसून आली. सध्या अश्विनी स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आपल्याला काम करताना दिसत आहे.

अश्विनीचे अजूनही लग्न झालेले नाही आणि ती सध्या एकटीच आहे. तिच्या  बॉयफ्रेंड बद्दल कोणतीच माहिती अजून पुढे आलेली नाही. तुम्हाला अश्विनीबद्दल काय वाटते आम्हाला नक्की सांगा.

About nmjoke.com

Check Also

या अभिनेत्रीला निर्मात्याने खोलीत डांबून ठेवलं होत

यशस्वी ठिकाणी पोहचायचे असेल तर त्यामागे त्या व्यक्तीचे खूप कष्ट आणि संघर्षमय कहाणी असते. यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *