अभिरामाची खरी बायको पहा किती सुंदर आहे

‘रा’त्रीस खेळ चाले ३’ ही मालिका थोड्या दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रसारित केली जात आहे. याआधीही झी मराठीने प्रसारित केलेल्या ‘रा’त्रीस खेळ चाले भाग १ आणि २’ ने प्रेक्षकांची करमणूक केली होती. त्या दोन्हीही भागांना दर्शकांनी जास्त प्रतिसाद दिल्याने झी मराठीने भाग ३ सुद्धा काढला आहे. या मालिकेत तुम्ही अभिरामला पाहिलेच असेल.

आज याच अभिरामच्या खऱ्या आयुष्याबद्दल आपण येथे माहिती घेणार आहोत. अभिरामचे खरे नाव संकेत कामत आहे. संकेतचा जन्म ७ ऑगस्ट १९९५ ला झाला. जास्तकरून सगळे अभिनेता अभिनेते हे मुं’बई पुणेला जन्माला आलेले असतात परंतु संकेतचा जन्म पणजी म्हणजेच गोवा येथे झाला आहे. संकेतचे शालेय शिक्षण प्रगती हायस्कूल गोवामधून झाले आहे.

तर हायस्कुल शिक्षण हे पीपल्स सेकंडरी हायस्कुल गोवामधून झाले आहे. त्याचे सर्व शिक्षण गोवामधूनच पूर्ण झाले आहे. त्याने थिएटर आर्टस् मध्ये पदवी प्राप्त केली आहे. २०१६ मध्ये पहिल्यांदा आलेल्या ‘रा’त्रीस खेळ चाले’ या मालिकेपासून अभिनय क्षेत्रात त्याने पाऊल ठेवले. ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटात देखील त्याने अभिनय केला आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेमुळे संकेतला जास्त ओळख मिळाली आणि तो घराघरांत पोहचला.

त्याच्या आईचे नाव राजश्री तर वडिलांचे नाव नागेश कामत आहे. संकेतला एक बहीण सुद्धा आहे. मानसी हेडो बरोबर संकेतचा २८ नोव्हेंबर २०१८ ला साखरपुडा झाला. संकेत जसं दिसायला हँडसम आणि कुल आहे तसेच मानसी सुद्धा काही कमी नाही. या दोघांची जोडी खुपच शोभून दिसते. तुम्हालाही संकेत म्हणजेच अभिराम कसा वाटतो आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *