वैभवी खऱ्या आयुष्यात बघा किती सुंदर दिसते

मित्रांनो, आता बऱ्याच जणांचा स्टार प्रवाह हा आवडता चॅनेल बनला असेल. या चॅनेलवर बऱ्याच नवीन नवीन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रसारित होत असतात. अशीच एक मालिका आहे जिचे नाव ‘सांग तू आहेस का’ हे आहे. ही मालिका काही दिवसांपूर्वीच चालू झाली आहे. यामध्ये वैभवी नावाचे एक पात्र आहे जी की आधीच मेलेली आहे परंतु तिच्या नवऱ्याच्या आजूबाजूला ती नेहमीच असते.

याच भू’त असलेली भूमिका करणाऱ्या वैभवीच्या खऱ्या आयुष्याबद्दल आपण आज येथे जाणून घेणार आहोत. वैभवीचे खरे नाव अभिनेत्री सानिया चौधरी आहे. सानियाचा जन्म २९ ऑक्टोबर १९९६ ला झाला. सानियाला अभिनयाबरोबरच कथ्थक हा नृत्य प्रकार सुद्धा उत्तमरीत्या करता येतो. अभिनय आणि नृत्याबरोबर तिला गायनाची सुद्धा आवड आहे.

सानियाने कथ्थक नृत्य प्रकारात मास्टर ही पदवी प्राप्त केली आहे. तिचा जन्म पुण्याचा असल्याने सर्व शिक्षण सुद्धा पुण्यातच झाले आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तीने उच्च शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना तिने अनेक एकांकिका तसेच डान्स स्पर्धेत भाग घेतला आहे आणि बरीच बक्षिसेसुद्धा मिळवली आहेत.

२०१९ पासून तिने ‘साजणा’ या मालिकेपासून टीव्ही पडद्यावर पदार्पण केले. तसेच मराठीमध्ये ‘त्या रात्री’ या मालिकेतही काम केले आहे. तिला एक भाऊ देखील आहे. सानिया ही सध्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेत वैभवीची भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारत आहे. तुमची या भूत असलेल्या वैभवीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सानियाबद्दल काय भावना आहेत, कमेंट द्वारे नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *