Breaking News
Home / कलाकार / शौनकसमोर आले दिव्या चे खरेरुप

शौनकसमोर आले दिव्या चे खरेरुप

स्टार प्रवाहवरील मालिका या जास्तच लोकप्रिय होत आहेत. यामधलीच एक आहे ‘मुलगी झाली हो’ ही मालिका. यामध्ये नुकतेच तुम्ही पाहिले की, माऊ म्हणजेच साजिरीचा आता विलास पाटील म्हणजेच तिच्या वडिलांनी स्वीकार केला आहे. सध्या मालिकेत साजिरी आणि शौनक यांबद्दल दाखवले जात आहे. इकडे शौनक आणि दिव्याचे लग्न ठरलेले असते परंतु साजिरी ही तिच्या आणि शौनक मधल्या गैरसमजुती दूर करत असते.

शौनक आणि माऊ दोघेही त्या मुलीचा शोध घेत असतात जिने शौनकला लहान असताना वाचवलेले असते. माऊला हे सिद्ध करायचे असते की, त्याला लहानपणी वाचवणारी ती मुलगी दुसरी कोणी नसून माऊच आहे. हे ती शौनकला सुद्धा सांगते परंतु त्याचा गैरसमज झालेला असतो. माऊ त्याला म्हणते मी तुझ्या आणि दिव्याच्या लग्नामध्ये येत नाहीये परंतु हा गैरसमज दूर करेल आणि मग मी शांत बसेल.

म्हणून दोघेही त्या डबेवाली मुलीचा शोध घेऊ लागतात परंतु त्यांना ती मुलगी भेटत नाही. त्या भागामध्ये जाऊन ते चौकशी सुद्धा करतात आणि त्यांना ती मुलगी सापडते जी त्याच्या वडिलांनी पैसे देऊन आणलेली असते आणि तिला खोटे बोलायला लावले असते की तिनेच लहानपणी शौनकचा जीव वाचवला. ती मुलगी काही वेळाने कबुल होते की, तिने पैशांसाठी हे सगळे केले.

इकडे दिव्या हे सगळं लपून बघत असते पण तिला तिच्या मुलीच्या आईने पाहिलेलं असतं आणि त्यामुळे तिच्या तोंडावरचे झाकलेले काढू लागते. तेवढ्यात शौनक आणि माऊ यांनाही समजते. शौनकला तो गैरसमज दूर झाल्यावर समजते की माऊ त्याच्याबरोबर खोटं नाही बोलतंय आणि हा वेगळ्याच कोणाचा तरी डाव आहे. आता शौनकला त्याच्या वडीलांबद्दल आणि दिव्याबद्दल शंका आहे मग आता पुढे जाऊन शौनक हे यांचे पितळ कसे उघडे पाडतो तसेच तो माऊ बरोबर लग्न करेल की दिव्या बरोबर हेही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हालाही याबद्दल काय वाटते आम्हाला नक्की सांगा.

About nmjoke.com

Check Also

या अभिनेत्रीला निर्मात्याने खोलीत डांबून ठेवलं होत

यशस्वी ठिकाणी पोहचायचे असेल तर त्यामागे त्या व्यक्तीचे खूप कष्ट आणि संघर्षमय कहाणी असते. यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *