दिपा ने घेतला मोठा निर्णय, पहा काय होणार आहे पुढे

‘रंग माझा वेगळा’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत अशा काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे मालिकेत पुन्हा काय होणार आणि मालिकेचा पुढचा भाग कधी प्रसारित होतो याकडे दर्शकांचे लक्ष असते. तुम्ही पाहिले असेल की, श्वेता कट कारस्थान करून कार्तिकने दोन्हीवेळा काढलेले फर्टिलिटी रिपोर्ट निगेटिव्ह आणते. ज्यामुळे कार्तिकला वाटते की तो कधीच बाप नाही होऊ शकत परंतु इकडे दीपा कार्तिकच्या मुलांची आई होणार असते.

रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे कार्तिक दीपाच्या चारित्र्यावर शंका घेतो आणि दीपा ही सुजयकडूनच गरोदर आहे असे त्याला वाटू लागते. हे सगळे श्वेताचे कारस्थान असते. यावरूनच डोहाळेजेवणाच्या वेळी कार्तिक दीपाला खूप भांडतो आणि डीएनए टेस्ट करायला लावतो परंतु दीपा त्यासाठी नकार देते. यामुळेच दीपा घर सोडून जाऊ लागते तर सौंदर्या तिला थांब म्हणून बोलते.

दीपा थांबत नाही कारण तिच्या चारित्र्यावर कार्तिकने संशय घेतलेला असतो आणि या सगळ्या प्रकारामुळे सौंदर्या बेशुद्ध पडते. दीपाला बाहेर गेल्यावर सनिभाई बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसतो. दीपा त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते आणि तो शुद्धीवर येत नाही तोवर ती तिथेच बसून राहते. जेव्हा सनिभाईला शुद्ध येते तेव्हा तो त्याला हॉस्पिटलमध्ये कोणी आणले हे विचारतो तेव्हा डॉक्टर दिपाचे नाव घेतो.

सनिभाईला खूप दुःख होते कारण त्याने जिच्यासाठी काम केलेले असते म्हणजेच श्वेता तिच त्याच्या जीवावर उठलेली असते आणि त्याने दीपाबरोबर वाईट करून सुद्धा दीपाने त्याला हॉस्पिटलमध्ये आणले आणि वाचवलेले असते. त्याला पश्चाताप होऊ लागतो आणि तो दीपाला श्वेताच्या सगळ्या करस्थानाबद्दल सांगतो. दीपाला समजते की, श्वेतामुळे कार्तिक असा करत आहे नाहीतर कार्तिकने कधीच दिपावर अशी शंका घेतली नसती.

दीपा नंतर घरी येते कारण तिला श्वेता आणि कार्तिकला भेटायचे असते. परंतु कार्तिकने इकडे घटस्फोटचे पेपर तयार करून ठेवलेले असतात आणि दीपाला पाहिल्यावर तो तिला घटस्फोट दे असं बोलतो. परंतु दीपा त्यालाही नकार देते आणि कार्तिकला फर्टिलिटी टेस्ट करूया असं सांगते पण कार्तिक नकार देतो.

तो म्हणतो तु एकतर डीएनए टेस्ट कर नाहीतर घटस्फोट दे पण दीपाला सर्व सत्य माहीत झालेले असते त्यामुळे ती या गोष्टीला तयारच होत नाही. दीपा म्हणते मला सर्व सत्य माहीत आहे, तू आधी फर्टिलिटी टेस्ट कर म्हणजे तुला सगळं खरं समजेल. आता पुढे कार्तिक दीपाचं ऐकेल का हे येणाऱ्या भागातच आपल्याला समजून येईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *