माझ्या नवऱ्याची बायको मधला गुरुनाथ बघा आता काय करतो

झी मराठीवरील एक गाजलेली मालिका म्हणजेच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही आहे. या मालिकेतील राधिका, शनाया आणि गुरुनाथ या प्रमुख भूमिकेत असणाऱ्या पात्रांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्यामुळेच आजही दर्शक या पात्रांना आठवतात तर काहीजण ही मालिका पुन्हा पुन्हा सुद्धा बघत असतात. या मालिकेतील हँडसम चेहरा म्हणजे गुरुनाथचा आहे.

गुरुनाथचे खरे नाव अभिनेता अभिजित खांडकेकर आहे. मालिकेत त्याला गॅरी म्हणून ओळखले जाते आणि या गॅरीचे मुली पटवण्याचे कसब आपण सगळ्यांनी पाहिलेच असेल. तो चुटकीसरशी मुलींना इम्प्रेस करू शकतो. अभिजितच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव सुखदा आहे आणि या दोघांचाही प्रेमविवाह झाला आहे. सुखदा ही उत्तम कथ्थक डान्सर आहे आणि तिने बऱ्याच नाटकातही काम केले आहे.

अभिजित हा मालिकेत अभिनय करण्याआधी आरजे होता तसेच त्याने बरेच रिऍलिटी तसेच वेगळेवेगळे शोचे सुत्रसंचालन केले आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या झी मराठीवरील मालिकेमुळे अभिजित घराघरांत ओळखीचा झाला. याआधी त्याने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही अभिजितची पहिलीच मालिका आहे.

अभिजित आता आपल्याला सोनी मराठीवरील नवीन मालिकेत नायक किंवा खलनायक म्हणून नाही तर सूत्रसंचालन करताना म्हणजेच सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेसारखीच गाजणारी मालिका ही सोनी मराठीवर येत आहे. या मालिकेचे नाव ‘क्रिमीनल्स चाहूल गुन्हेगारांची’ हे आहे. मित्रांनो, तुम्हीही ही मालिका नक्की बघा आणि अभिजितचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *