रंग माझा वेगळा मधल्या कार्तिक ची खरी दीपा हि तर नाही?

‘रंग माझा वेगळा’ ही मराठीमधील सर्वांत आवडीची मालिका म्हणून सध्या प्रसिद्ध आहे. या मालिकेतील कार्तिक आणि दीपाची जोडी ही प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. या मालिकेत अनेक प्रसिद्ध कलाकार अभिनय करत आहेत. कार्तिक हे पात्र अभिनेता आशुतोष गोखले साकारत आहे. आशुतोष हा खऱ्या आयुष्यात सुद्धा तेवढाच संवेदशील आहे, जसे या मालिकेत दाखवले आहे.

त्यामुळेही कदाचित कार्तिक ही व्यक्तिरेखा त्याला खूप साजेशी आहे. आशुतोष हा अनेक सामाजिक कार्यक्रमात भाग घेत असतो. पाणी फाउंडेशन मध्ये त्याने श्रमदान केले आहे आणि कोरोना महामारीमुळे बऱ्याच गरिबांना रोजचे जेवण मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे आशुतोषने अशा अनेक गरीब लोकांना सुद्धा मदत केली आहे. कार्तिक या व्यक्तिरेखेमुळे आशुतोष खुपच गाजला आहे.

आशुतोष हा प्रसिद्ध मराठी अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे. झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत सुद्धा त्याने जयदीप सरंजामे ही भूमिका केली जी खुपच गाजली. कार्तिकला अभिनय क्षेत्रात यावे असे आधी वाटले नव्हते. त्याचा कल क्रिकेटकडे जास्त होता. परंतु कॉलेजनंतर त्याला एक नाटकात काम केल्यानंतर अभिनय करावे असे वाटले.

कार्तिकने एकदा सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता ज्यात एक मुलगी त्याला पप्पी देतेय असे दिसत आहे. कोण आहे ती मुलगी? त्याची गर्लफ्रेंड आहे की बायको? जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा. ही पप्पी देणारी मुलगी म्हणजे दुसरी कोणी नसून अभिनेत्री प्रिया बापट आहे. हा फोटो पोस्ट करत असताना आशुतोषने लिहिले आहे की,

‘तिच्या लग्नाला दहा वर्षे झाल्यानंतर फायनली मला ती मिळाली…प्रिया बापट नाही..तिची पप्पी.’ यावर प्रियाने सुद्धा ‘ये देखके कितने घायल हुए’ अशी कमेंट टाकली आहे. या दोघांची मैत्री खूपच चांगली आहे. कार्तिकचे अजूनही लग्न झाले नाही, तो सध्या सिंगल आहे. तुम्हालाही ‘रंग माझा वेगळा’ मधील कार्तिक कसा वाटतो, कमेंट मध्ये नक्की सांगा.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *