या कारणामुळे मराठमोळ्या लता मंगेशकर ने लग्न केले नाही

आपण करमणूक होत नसेल किंवा करमत नसेल तर जास्तकरून गाणे ऐकत बसतो. सुरांची कोकिळा म्हणजेच लता मंगेशकर यांची बरीच गाणी तुम्ही आत्तापर्यंत ऐकली असतील. अत्यंत मधुर आवाज असणाऱ्या लता यांनी आजपर्यंत खूप गाणी गायली आहेत. यांची गाणी ऐकणाराच्या डोळ्यातही पाणी येते तसेच मनात प्रेमाची भावना सुद्धा निर्माण होते.

परंतु गायन क्षेत्रात एवढया उच्च ठिकाणी पोहचूनही बऱ्याच जणांना अजूनही एक प्रश्न पडतो की, लता मंगेशकर यांनी आजपर्यंत लग्न का केले नाही? त्यांना कोणी अशी व्यक्ती भेटलीच नाही का जी त्यांच्यावर प्रेम करेल? एवढ्या देशाचेच नाहीतर जगाचे प्रेम लता यांना मिळाले परंतु तरीही लता या आजपर्यंत एकट्या का राहिल्या? चला तर मग जाणून घेऊया यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे.

प्रेमासंबंधी लता यांनी आजपर्यंत एवढी गाणी गायली आणि त्यांना खऱ्या आयुष्यात प्रेम झाले नसेल असे नाही होऊ शकणार. लता यांनी एका व्यक्तीवर प्रेम केले आणि त्याच प्रेमासाठी आजपर्यंत त्या एकट्या आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, कुटुंब आणि त्याच्या बहिणभावांच्या जबाबदारीमुळे लग्न केले नाही. हे एक कारण आहे की, त्यांनी आजपर्यंत लग्नाचा विचार केला नाही परंतु यापेक्षाही एक वेगळे कारण आहे जे आपण जाणून घेऊयात.

असे बोलले जाते की, लता यांना भावाच्या एका मित्रावर प्रेम झाले ज्याचे नाव राज सिंग आहे आणि ते डोंगरपूर घराण्याचे राजा होते. हृदयनाथ आणि राज हे दोघेही एकत्र शिक्षण घेत होते आणि क्रिकेतही खेळत असे. लता यांनाही क्रिकेट आवडत होते आणि यावेळेपासूनच लता यांना राज आवडू लागले होते. लता या यावेळी त्यांच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या.

लता आणि राज यांची बाहेर चर्चा होऊ लागली होती आणि समजले होते की, या दोघांमध्ये प्रेम झाले आहे. परंतु यांनी आजपर्यंत या गोष्टीबद्दल कधीही काहीही बोलले नाही. राज हे लता यांना ‘मिठू’ या नावाने बोलवत असत आणि बरोबर एक टेप रेकॉर्डर जवळ ठेवत असे ज्यात लता यांची गाणी असायची. राज यांनी आधीच त्यांच्या घरच्यांना वचन दिले होते की, ते राज घराण्यातीलच मुलीबरोबर लग्न करतील परंतु त्यांना लता यांच्यावर प्रेम झाले.

राज आणि लता यांनी आजपर्यंत लग्न केले नाही आणि पूर्ण आयुष्यभर बिनालग्नाचे राहिले. हेही लता यांचे लग्न न करण्यामागचे एक कारण मानले जाते. स्वतःच्या गाण्यांमुळे दुसऱ्यांच्या मनात प्रेम निर्माण करणाऱ्या लता मंगेशकर या मात्र प्रेमापासून लांब राहिल्या. परंतु जसे लता यांनी आपल्याला खुप चांगली गाणी दिली तसेच जनतेने त्यांना खूप प्रेमही दिले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *