रंग माझा वेगळा मधली निकिता किती होत आहे पहा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला दर्शकांचे खूपच प्रेम मिळत आहे. मालिकेत जेवढा मुख्य कलाकारांचा अभिनय महत्वाचा असतो तेवढाच सहकलाकारांचा सुद्धा असतो. सौंदर्या इनामदारची सेक्रेटरी म्हणजे निकिता. सौंदर्या काही जरी काम असेल तरी ते निकिताला सांगताना आपण पाहिले आहे. निकिता ही सेक्रेटरीचा अभिनय अतिशय चांगल्या प्रकारे साकारत आहे.

आज आपण निकीताच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो न्यूज अँकर म्हणल्यावर त्या व्यक्ती बऱ्याच प्रसिद्ध आणि चर्चेत असतात. निकिता ही सुद्धा एक न्यूज अँकर आहे. परंतु अभिनेत्री म्हणूनही तिने चांगले नाव कमावले आहे. निकिता ही ‘जय महाराष्ट्र’ चॅनेल वरील न्यूज अँकर आहे जिचे खरे नाव अमृता बने आहे. आधी रिपोर्टर नंतर अँकर तर आता अभिनेत्री असा तिचा प्रवास आहे.

अमृताचा जन्म १४ मे १९९४ ला मुंबईत झाला. तिचे सर्व शिक्षण मुंबईमधूनच झाले आहे. अभिनयाची आवड असल्याने तिने मिडिया क्षेत्र सोडले आणि अभिनय करू लागली. रिपोर्टर आणि अँकर हे कामही काही सोप्पे नसते परंतु तिने खूप चांगल्या प्रकारे ते निभावले. अँकरिंग करता करता तिला अभिनय करणे जमत नव्हते. तिला तेवढा वेळ पुरत नव्हता. त्यामुळे तिने न्यूज अँकरिंग करणे बंद केले. अमृताची पहिली मालिका म्हणजे ‘श्री गुरुदेव दत्त’.

यात मंदार जाधव याने दत्ताची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिने सरस्वतीची भूमिका केली आणि याच मालिकेमुळे तिचे अभिनय क्षेत्रात येण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता ती ‘रंग माझा वेगळा’ मध्ये एका मोठ्या कंपनीच्या मालकिणीची म्हणजेच सौंदर्या इनामदारची सेक्रेटरी आहे. सौंदर्या म्हणजेच हर्षदा खानविलकर आणि अमृता या दोघीही आता चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. ही भूमिका अमृता उत्तमरीत्या साकारत आहे. अमृताच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याकडून तिला शुभेच्छा देऊयात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *