Home / कलाकार / या अभिनेत्याने सोडली आई माझी काळूबाई मालिका

या अभिनेत्याने सोडली आई माझी काळूबाई मालिका

नेहमीच चर्चेत असणारी आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेली मालिका म्हणजेच ‘आई माझी काळूबाई’. या मालिकेची निर्माती अलका कबुल आहे. ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका सोनी मराठीवर प्रसारित केली जाते. या मालिकेतील प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आधी ही मालिका सोडून गेली. प्राजक्ता ही मालिका का सोडून हे तुम्हाला माहीतच असेल.

त्यानंतर तिच्या जागी वीणा जगतापला संधी मिळाली. काही दिवसांनी कोरोनाचाही लागण या मालिकेच्या शूटिंग सेटवर झाली होती आणि त्यात प्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचेही निधन झाले. आता ही मालिका अजून एका अभिनेत्याने सोडली आहे. तो अभिनेता कोण आहे? आणि ही मालिका सोडण्यामागचे नक्की कारण काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात.

तुम्ही जर ही मालिका पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की या मालिकेतील आर्याचे बाबा काही दिवस झाले दिसत नाहीत. आर्याच्या बाबांचे खरे नाव शरद पोंगसे आहे. शरद यांनी काही कारणास्तव ही मालिका सोडली आहे. अभिनेता म्हणल्यानंतर बऱ्याच जणांबरोबर असे घडते की वेगळ्या वेगळ्या मालिकांचे शूटिंग एकदाच असते आणि काही बाबतीत तो वेळ बदलू नाही शकत.

असेच काहीसे घडले शरद यांच्याबरोबर. कलर्स मराठीवरील ‘बावरा दिल’ या मालिकेतही तुम्हाला शरद पोंगसे दिसले असतील. या मालिकेत ते मुख्य नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. परंतु ‘आई माझी काळूबाई’ आणि ‘बावरा दिल’ या दोन्ही मालिकांची शूटिंग एकाच वेळी चालू असल्याने शरद यांनी ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका सोडल्याचे दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटते शरद यांनी कोणत्या मालिकेत काम करायला पाहिजे होते? ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका त्यांनी सोडली त्याबद्दल तुमचे काय मत आहे?

About nmjoke.com

Check Also

दिसायला जरी चांगली नसली तरी हीच बोलणं ऐकून तिच्या प्रेमात पडाल

भारत ज्याप्रमाणे विविधतेत नटले आहे त्याप्रमाणेच भारतात बुद्धिमान, कुशल आणि हुशार माणसांची पण कमी नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *