शशांक केतकर च्या दोन्ही बायका पहा किती सुंदर आहेत

शशांक केतकरला आपण नेहमीच नायकाच्या भूमिकेत पाहिले आहे. परंतु ‘पाहिले ना मी तुला’ या मालिकेत पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत पाहत आहे. शशांक हा खुपच उत्तम अभिनय करतो. त्याच्या अभिनयाचे नेहमीच चाहते कौतुक करत असतात. ‘होणार सून मी हया घरची’ या मालिकेतील श्री या व्यक्तिरेखेमुळे तो घराघरांत पोहचला. श्री आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांना खुपच आवडली.

या मालिकेच्या शूटिंग दरम्यान दोघेही खऱ्याखुऱ्या आयुष्यात प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नही केले. मालिकेत जरी हे दोघे एकत्र आणि सुखाने संसार करत असले तरी खऱ्या आयुष्यात काही वेगळे होते. दोघेही एका वर्षातच एकमेकांपासून वेगळे झाले. जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान ही शशांकची पहिली बायको आहे. यांचे लग्न २०१४ मध्ये झाले आणि २०१५ मध्ये घटस्फोट झाला.

यांचा घटस्फोट झाल्यामुळे अनेक जण धक्क्यात होते की यांनी असे का केले? नंतर २०१७ मध्ये शशांकने प्रियांका धवले बरोबर लग्न केले. शशांक आणि प्रियांका हे दोघेही मित्रमैत्रिण आहेत. एकमेकांच्या घरी दोघेही ओळखीचे होते. या दोघांचाही प्रेमविवाह झाला आहे. दोघांची पहिली भेट फेसबुकवर झाली. प्रियांका ही उत्तम डान्सर आहे आणि एका कार्यक्रमात या दोघांची समोरासमोर भेटले आणि तेव्हापासून यांचे बोलणे वाढले.

प्रियांका ही एक वकील आहे. जरी शशांक हा अभिनेता आणि प्रियांका वकील असली तरी या दोघांचे खूप चांगले जमते. दोघेही एकमेकांना खूप साथ देतात आणि जिथे गरज असेल तिथे एकमेकांना समजवतात सुद्धा. थोडक्यात हे परफेक्ट कपल आहे. फेसबुक ते मैत्री आणि लग्न असा त्यांचा प्रवास आहे. तुम्हालाही या दोघांची जोडी कशी वाटते? दोन्हीही बायका जरी सुंदर असल्या तरी आयुष्यात शेवटी नशिबात असेल तेच होते. तुम्हाला शशांक कोणाबर जास्त आवडतो? आम्हाला नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *