या अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या बायको ने शेअर केले हॉट फोटो

सिनेसृष्टीतील अभिनेता-अभिनेत्रींची दुसरी लग्न म्हणजे आता काही नवीन गोष्ट नाही. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ हा नुकतंच लग्नाच्या बंधनात अडकला आहे. संग्रामचे हे दुसरे लग्न आहे. त्याने लग्नाचे बरेच फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत आणि चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघेही फोटोत खूपच सुंदर दिसत आहेत.

२०१६ मध्ये संग्रामने पल्लवी पाटील बरोबर लग्न केले, हे संग्रामचे पहिले लग्न होते. परंतु काही कारणांमुळे पल्लवी आणि संग्राम वेगळे झाले. पल्लवीही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे. संग्राम समेळ हा ‘पुढचं पाऊल’ मधल्या त्याच्या समीर नावाच्या व्यक्तीरेखेमुळे घराघरांत पोहचला. त्याने ‘एकच प्याला, कुसुम मनोहर लेले’ या नाटकांत काम केले आहे.

‘ललित 205, हे मन बावरे’ या मालिकांतही काम केले आहे. ‘विकी वेलिंगकर, स्वीटी सातारकर, ब्रेव हार्ट’ या चित्रपटांतही त्यानं काम केलं आहे. पल्लवी ही दिसायला अतिशय सुंदर आहे. तिने नुकतंच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्या फोटोतील तिची पोज आणि चेहऱ्यावरचे हावभाव पाहून कोणीही तिचा दिवाना होऊन जाईल. तिने चाहत्यांसाठी एक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केला आहे.

या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये आहे आणि एका पोजमध्ये तिने हा फोटो काढला आहे जो सर्वांना खूप आवडला. या फोटोंवर बऱ्याच कमेंट सुद्धा आल्या आहेत की, ती खूप हॉट दिसत आहे. ‘रुंजी, बापमाणुस, अग्निहोत्र २’ या मालिकेमुळे पल्लवी घराघरांत पोहचली आणि प्रेक्षकांच्या आवडीची झाली. ‘पार्टनर’ या एकांकिकेमुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली.  तुम्हालाही हा फोटो कसा वाटतो नक्की कमेंट मध्ये कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *