Home / कलाकार / मालिका सोडल्यानंतर बबड्या आता हा करतो उद्योग

मालिका सोडल्यानंतर बबड्या आता हा करतो उद्योग

‘आग्गबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडली म्हणायला हरकत नाही कारण दर्शक आजही या मालिकेतील कलाकारांच्या इन्स्टाग्राम तसेच फेसबुक अकाऊंटवर फॉलो करतात. त्यांची आठवण काढतात. या मालिकेत आपण नवरा-बायको, आई-मुलगा, सासू-सून या सगळ्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम बघितले.

या मालिकेत आपण निवेदिता यांना सासूची भूमिका साकारताना पाहिले तर गिरीश ओक यांना शेफ अभिजित राजे यांची भूमिका साकारताना पाहिले. तसेच यांचा मुलगा म्हणजेच बबड्या आणि त्याची बायको यांचेही तिखटमीठाचे नाते दाखवले आहे. ‘आग्गबाई सासूबाई’ मालिकेत आपण पहिल्यांदाच असे पाहिले असेल की, सून ही सासूचे लग्न लावून देते. खरंच ही गोष्ट मजेशीर आहे.

ही मालिका काही दिवसांपूर्वीच बंद झाली तरीही या मालिकेचे चाहते या मालिकेची अजूनही आठवण काढतात. ही मालिका बंद झाली म्हणल्यावर या मालिकेतील कलाकार आता कोणत्या दुसऱ्या मालिकेत काम करत आहेत का? की ते घरीच बसून आहेत? चला तर मग इथे आपण सर्वच कलाकारांची आता ते काय करत आहेत याची माहिती तर नाही घेणार परंतु या मालिकेतील  बबड्या बद्दल जाणून घेऊयात.

थोड्याच काळात बबड्या हा या मालिकेमुळे घराघरांत पोहचला. त्याने लोकांची मने जिंकली. बबड्याचे खरे नाव आशुतोष पत्की आहे. नुकतंच आशुतोषने इन्स्टा’ग्राम अकाऊंटवर त्याचा जिममधला एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात तो डंबल उचलताना दिसत आहे. या फोटोच्या खाली त्याने असेही लिहिले आहे की, ‘कामाचे नियोजन करा आणि नियोजनपूर्वक काम करा.’ या को’रो’ना महा’मा’रीमुळे बऱ्याच जणांचे नुकसान झाले आहे. कदाचित आशुतोष हा सध्या घरात बसून नवीन नवीन गोष्टी शिकत असेल. या वाईट काळामुळे सगळ्यांनी एकमेकांची साथ द्यावी आणि एकमेकांना मदत करावी.

About nmjoke.com

Check Also

दिसायला जरी चांगली नसली तरी हीच बोलणं ऐकून तिच्या प्रेमात पडाल

भारत ज्याप्रमाणे विविधतेत नटले आहे त्याप्रमाणेच भारतात बुद्धिमान, कुशल आणि हुशार माणसांची पण कमी नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *